TRENDING:

नोकरी सोडली अन् सुरू केला स्वतःचा व्यवसाय, मराठी दाम्पत्य आज करत आहे लाखोंची उलाढाल

Last Updated:

नोकरी सोडून स्वतःचा काही व्यवसाय सुरू करावा या करता नाशिकमधील एका मराठी जोडप्याने पिज्झा सेंटर सुरू केले आहे. नोकरीत घरातील गरजा भागत नसल्याने ऐश्वर्या आणि प्रशांत पाटील यांनी त्यांच्या नवीन 'द पिज्झा शॉप' नावाच्या शॉपला सुरवात केली, असल्याचे लोकल 18 सोबत बोलताना यांनी सांगितले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नोकरी सोडून स्वतःचा काही व्यवसाय सुरू करावा या करता नाशिकमधील एका मराठी जोडप्याने पिज्झा सेंटर सुरू केले आहे. नोकरीत घरातील गरजा भागत नसल्याने ऐश्वर्या आणि प्रशांत पाटील यांनी त्यांच्या नवीन 'द पिज्झा शॉप' नावाच्या शॉपला सुरवात केली, असल्याचे लोकल 18 सोबत बोलताना यांनी सांगितले.
advertisement

भुलेश्वर मार्केटमध्ये फक्त ₹550 पासून घागरा-चनिया चोली

प्रशांत आणि ऐश्वर्या यांचे लवमॅरेज असून सुरवाती पासून त्यांनी लग्नानंतर स्वतःचा व्यवसाय करण्याचे ठरवले होते.

परंतु लग्नानंतर आर्थिक अडचणी आणि घर खर्च निघण्यासाठी इतरांच्या हाताखाली नोकरी देखील केली. नोकरी करत असताना स्वतःच्या व्यवसायाचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी आलेल्या पगारातील काही पैसा साठवून आज स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.

advertisement

महिलांनी हृदयाचे आरोग्य उत्तम कसे राखावे? जाणून घ्या तज्ञांचे मत…

आता नोकरी सोडून प्रशांत सकाळी नाशिकमधील मखमलाबाद नाका परिसरात चहा विक्री करत असतो आणि सायंकाळी ऐश्वर्यासोबत पिज्झा सेंटर चालवत असतात. कुठल्याही कामात लाज वाटत नाही आणि जे करतो त्यातून काही शिकायला मिळते असे प्रशांत नेहमी सांगत असतो.

परीक्षा न देताच ST महामंडळात मिळणार नोकरी, शेवटची तारीख आली जवळ; लगेच करा अर्ज..

advertisement

प्रशांत आणि ऐश्वर्या हे मराठी दाम्पत्य एका छोट्या हातगाडीवर रोज संधायकली मखमलाबाद परिसरात द पिज़्ज़ा शॉप चालवत असतात. तसेच नोकरीत जितका पैसा दोघानाही मिळत नाही होता त्या पेक्षा जास्त पैसे आज ही जोडी त्यांच्या व्यवसायातून मिळवत असल्याने त्यांनी लोकल 18 च्या माध्यमातून सांगितले आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
नोकरी सोडली अन् सुरू केला स्वतःचा व्यवसाय, मराठी दाम्पत्य आज करत आहे लाखोंची उलाढाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल