चाप हा सोयाबीनपासून तयार केलेला एक शाकाहारी पदार्थ आहे. पाहिल्यावर अनेकांना तो चिकनसारखा वाटतो, पण हे आहे शुद्ध शाकाहारी. चव मात्र इतकी अप्रतिम की एकदा खाल्ल्यावर चिकनचा विचारही मनात येणार नाही. चवीला थोडं तिखटसर, मसालेदार आणि तरीही सौम्य असा हा पदार्थ पावसाच्या थंड हवामानात अगदी जिभेवर रेंगाळतो.
advertisement
GTB नगर स्टेशन (पूर्व) बाहेर तरुण उद्योजक तरुण सिंग यांचा स्टॉल आहे. वय अवघं 27, पण खाद्यप्रेमींच्या जिभेवर राज्य करत आहेत. 2 वर्षांपूर्वी तरुण दीप यांचा रेल्वे अपघात झाल्याने त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले. पण हार न मानता त्यांनी गेल्या दीड-दोन वर्षांपासून स्वयंपाकातली रुची व्यवसायात रूपांतरित करत त्यांनी या चाप स्टॉलची सुरुवात केली. चाप ऑन व्हील्स या नावाने नवीन व्यवसाय सुरू केला आणि आज तो परिसरात एक खास नाव झालं आहे.
फक्त 90 रुपयांमध्ये मिळणारा हा चाप, एक प्लेट पुरेपूर समाधान देतो. त्यावर ओतलेला खास मसाला, लिंबू, कांदा आणि तव्यावर छान खरपूस परतलेली चव हे सगळं मिळून चविष्ट अनुभव देतं. पावसात असा गरमागरम चाप खाणं म्हणजे खरं तर जिभेचं, मनाचं आणि पोटाचं तृप्तिकरण होय.
पावसाळ्यात चाप खाण्याचा आनंद काही औरच. एक तर शरीराला उष्णता देणारा, पचनास सोपा आणि प्रोटीनयुक्त असल्यामुळे आरोग्यदृष्ट्याही उपयुक्त. चिकन न खाणाऱ्यांसाठी हा एक परिपूर्ण पर्याय आहे. शिवाय, स्वस्त, स्वादिष्ट आणि ताजं हे सगळं मिळून चापला पावसाळ्याच्या खवय्ये यादीत अव्वल स्थान मिळवून देतं.
तरुण दीप सिंह यांचे चाप ऑन व्हील्स हे GTB नगर स्टेशन पूर्वपासून 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. याची किंमत 90 रुपये प्रति प्लेट आहे. दररोज सायंकाळी 5 नंतर ही फूड स्टॉल सुरू होत.