ढक्कू हा कोकणातील पदार्थ. तसा तो वेगवेगळ्या डाळींपासून वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. पण मुगाच्या डाळीचा ढक्कू फेमस आहे, असं शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितलं. त्यांनीच याची रेसिपीही दाखवली आहे. त्याचा व्हिडीओ त्यांनी युट्युबवर शेअर केला आहे.
Poha Recipe : कांदेपोहे खाऊन कंटाळलात मग बनवा पोहा चटणी आणि चटणीचे पोहे; पोह्याचे हटके 2 पदार्थ
advertisement
मुगाच्या डाळीचा ढक्कू बनवण्यासाठी साहित्य
मुगाची डाळ
गरम पाणी
हळद
बारीक चिरलेला कांदा
हिंग
काळी मिरी पूड
मीठ
तेल
मोहरी
हिरवी मिरची
लसूण
हिंग कोथिंबीर
मुगाच्या डाळीचा ढक्कू कसा बनवायचा?
मुगाची डाळ मंद आचेवर खमंग भाजून घ्या. तोपर्यंत डाळीच्या तिप्पट पाणी एका भांड्यात उकळायला ठेवा. आता भाजलेल्या डाळीत हे गरम पाणी ओता. आता त्यात हळद, बारीक चिरलेला कांदा आणि तुम्हाला जितकं तिखट हवं तितकी काळी मिरीची पूड टाका. मंद आचेवर शिजवून घ्या. डाळ शिजली की ती घोटून घ्या. गरजेनुसार पाणी घाला. चवीनुसार मीठ टाकून ढवळून घ्या.
Butter Recipe Video : बाजारात मिळणारं बटर घरीच कसं बनवायचं? शेफने दाखवली रेसिपी
आता फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी, हिरवी मिरची, लसूण आणि गॅस बंद करून हिंग टाका. ही फोडणी डाळीत ओता. कोथिंबीर टाकून सर्व्ह करा. डाळ ढक्कू तयार. तुम्ही हे भाजीसोबत आणि भातासोबतही खाऊ शकता.
रोजच्या मुगाच्या वरणापेक्षा वेगळ्या पद्धतीची ही डाळ ढक्कू एकदा ट्राय करून पाहा आणि कसा झाला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
