TRENDING:

Egg Rate: मुंबई पुण्यातील अंड्याचे भाव 5 वर्षातील उच्चांकावर, आता किती मोजावे लागणार?

Last Updated:

Egg Rate: गेल्या काही काळात अंड्यांच्या दरांत विक्रमी वाढ झाली आहे. पुणे आणि मुंबईत अड्यांच्या दरांनी 5 वर्षांतील उच्चांक गाठला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: आपल्याकडे आहाराचा मुख्य भाग असणाऱ्या अंड्यांना बाराही महिने मागणी असते. परंतु, नेहमी 4 ते 5 रुपयांना मिळणारी अंडी आता 7 ते 8 रुपयांपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. होलसेल बाजारात मार्चमध्ये 470 रुपयांना शेकडा असणारी अंडी आता 591 रुपयांवर गेली आहेत. मुंबई, पुण्यात अंड्यांचे दर विक्रमी पातळीवर गेले असून एक डझन अंड्यांसाठी 80 ते 90 रुपये मोजावे लागत आहेत. मुंबईतील व्यापारी वसीम शेख यांनी याबाबत लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
advertisement

मुंबई, पुण्यात अंडी महाग

राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अंड्यांचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. जून अखेर असूनही दर कमी होण्याऐवजी सातत्याने वाढतच आहेत. सध्या मुंबईतील अनेक भागांमध्ये एका डझन अंड्यांचा किरकोळ दर 78 ते 90 रुपयांपर्यंत गेला असून, पुण्यात देखील 84 रुपयांपर्यंत विक्री होत आहे. मार्च 2025 मध्ये मुंबईतील अंड्यांचा घाऊक दर प्रति 100 अंडी 470 रुपये होता. जूनमध्ये तो 600 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. नॅशनल एग कॉर्डिनेशन कमिटी (NECC) च्या माहितीनुसार, जून महिन्यात दर 570 ते 610 रुपयांच्या दरम्यान राहिला आहे. ही दरवाढ गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक आहे.

advertisement

Gold Rate: सोनं एक लाखांच्या पार, खरेदीचा ट्रेंडच बदलला, सराफा बाजारातून मोठं अपडेट

मुंबईत दर काय?

मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी येथे अंडी 90 रुपये डझन विकली गेली. बोरिवली व बांद्रा येथे 80 रुपये, तर वसईतील दर 78 रुपयांवर आहे. चेंबूर व कांजुरमार्ग येथे ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांना एका डझन अंड्यांसाठी 117 रुपये मोजावे लागले. विशेष प्रकारच्या सहा अंड्यांचे बॉक्स 57 रुपयांना विकले जात आहेत.

advertisement

का महागली अंडी?

महाराष्ट्र अंडी व्यापारी संघटनेचे सदस्य वसीम शेख यांनी सांगितले की, “उन्हाळ्यात कोंबड्या उष्माघातामुळे मरतात, त्यामुळे उत्पादन घटते. पावसामुळे वाहतूक व पुरवठा साखळी अडथळलेली आहे. यामुळे सध्या अंड्यांचा पुरवठा मर्यादित आहे आणि मागणी वाढलेली आहे.”

दरवाढीमागे आणखी काही कारणेही आहेत. यामध्ये शाळा पुन्हा सुरू झाल्यामुळे अंड्यांची मागणी वाढली आहे. तसेच, श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी अनेक ग्राहक अंडी साठवून ठेवतात. त्याचबरोबर, अलीकडेच तामिळनाडू येथील नमत्क्कलमधून अमेरिका येथे एक कोटी अंड्यांची निर्यात झाल्याचेही दरवाढीमागचे महत्त्वाचे कारण मानले जात आहे.

advertisement

पुण्यातील अंड्यांचे दर

पुण्यातही अंड्यांचे दर झपाट्याने वाढले असून, मे महिन्याच्या सुरुवातीस 66 रुपये डझन असणारी अंडी सध्या 84 रुपयांपर्यंत पोहोचली आहेत. घाऊक दरही 485 वरून 601 रुपयांपर्यंत गेले आहेत. दरवाढ अजून काही काळ कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील 15-20 दिवसांत हवामान सुधारल्यास आणि उत्पादन पुन्हा सुरू झाल्यास दर काहीसे स्थिर होऊ शकतात, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Egg Rate: मुंबई पुण्यातील अंड्याचे भाव 5 वर्षातील उच्चांकावर, आता किती मोजावे लागणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल