ज्ञानेश्वर याने आयटीआयमध्ये शिक्षण घेऊन याच क्षेत्रात डिप्लोमा केला आणि त्यानंतर एका खासगी कंपनीत काम देखील केले. 4 वर्ष त्या ठिकाणी काम करत असताना स्वतःचा व्यवसाय असावा अशी पत्नीची इच्छा असल्याने ज्ञानेश्वर याने नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्याने श्रीराम राबडीवाला या नावाने रबडी विक्रीच्या व्यवसाय सुरू केला आणि तो यशस्वी देखील झाला.
advertisement
Ice Tea Recipe : उन्हाळ्यात शरिराला फायदेशीर, झटपट बनवा आईस टी, संपूर्ण रेसिपी
आज ज्ञानेश्वर याच्याकडे तब्बल 12 ते 15 प्रकारांमध्ये रबडीचे फ्लेवर मिळत असतात. तसेच हे सर्व साहित्य ज्ञानेश्वर हा स्वतःहा बनवून घेत असतो. यासाठी लागणारे दूध तसेच साहित्य ही सर्व उच्च प्रतीची असतात. यात वापरले जाणारे दूध हे लॅब टेस्टिंग करून यात वापरले जात असल्याचे ज्ञानेश्वर याने लोकल 18 सोबत बोलताना सांगितले. या व्यवसायातून ज्ञानेश्वर हा महिन्याला 1 लाखापर्यंत उत्पन्न घेत आहे.
कुठे आहे यांचे दुकान?
नाशिकमधील नाशिक रोड बारील बिटको चौफुलीला तसेच त्रिमूर्ती चौक आणि आणि मुख्य शाखा ही नारायण बापू चौक जेल रोड या ठिकाणी श्रीरॅम रबडी या नावाने उपलब्ध आहे.