कशी झाली पात्रा मोमोजची सुरुवात?
ठाण्याच्या अष्टविनायक चौक परिसरात असलेले हे स्पाइस फाइव सिक्स नामक फूड ट्रक एक तरुणी चालवते. सृष्टी कांबळे असे या तरुणीचे नाव आहे. सृष्टीने हॉटेल मॅनेजमेंट केले असल्यामुळे तिला विविध प्रकारचे पदार्थ तयार करण्याची भरपूर आवड आहे. पात्रा मोमोजची संकल्पना देखील तिची स्वतःचीच आहे. सृष्टी कोकणपट्ट्यावर राहत असल्यामुळे केळीच्या पानात जेवण करण्याची सवय तिला होती. त्यामुळे एकदा सहजच मोमोज तयार करताना तिने पात्रा मोमोज म्हणजेच केळीच्या पानात मोमोज तयार केले आणि घरातल्यांना ते खाऊ घातले. सर्वांना ते आवडले देखील म्हणून तीने तिच्या फूड ट्रकवर आता हे मोमोज विकण्यास सुरु केले आहे.
advertisement
यंदाच्या 31 डिसेंबरला घरीच बनवा हॉटेल स्टाईल सुरमई रवा फ्राय, पाहा रेसिपी Video
काय आहे किंमत?
ऑथेंटिक चिकन मोमोज खाण्यासाठी हे फूड ट्रक नक्कीच एक उत्तम पर्याय आहे. येथील प्राईज रेंज देखील अतिशय पॉकेट फ्रेंडली आहे. अगदी 40 ते 100 रुपयांचा आत मोमोज सोबत आणखीन स्नॅक्स पदार्थांचा या ठिकाणी आस्वाद घेता येईल.
चिकन बिर्याणी विसरा, कधी चिकन भेळ खाल्ली का? जबरदस्त आहे टेस्ट Video
पात्रा मोमोजचे वैशिष्ट्य?
पात्रा मोमोज हे चिकन त्याचप्रमाणे पनीरचे देखील तयार केले जातात. पात्रा मोमोज हे केळीच्या पानात ग्रेव्ही सोबत उकडून घेतले जातात. पात्रा मोमो सोबत असणारी ग्रेव्ही हे कोकण आणि महाराष्ट्रातले इतर ठिकाणचे एकत्र कॉम्बिनेशन आहे. त्याबरोबरच केळीच्या पानामुळे त्या मोमोजना विशिष्ट चव येते. या पात्रा मोमोजना कोकणपट्ट्याच्या जेवणाची चव आहे, अशी माहिती सृष्टी कांबळेने दिली आहे.