कमी किमतीत हटके ऑफर
फक्त 30 रुपयांत एक प्लेट आणि 90 रुपयांत अनलिमिटेड पाणीपुरी अशी खास ऑफर इथे आहे. या पाच चवींमध्ये खट्टी-गोड, तिखट, पुदिना, कच्चा मँगो, मसालेदार आणि एक खास स्पेशल फ्लेवरचा समावेश आहे. प्रत्येक घास वेगळी चव आणि वेगळा अनुभव देतो. पिंपरी-चिंचवड तसेच पुण्यातून अनेकजण या आगळ्या वेगळ्या पाणीपुरीचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. विशेषता संध्याकाळच्या वेळेला या स्टॉलवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पाणीपुरीची ही हटके स्टाईल सोशल मीडियावरदेखील जोरदार व्हायरल झाली आहे.
advertisement
नोकरीतून व्यवसायाकडे प्रवास
'वाह पाणीपुरी' हा स्टॉल विशाखा पाटील यांचा आहे. याआधी त्या नोकरी करत होत्या, पण स्वतःचं काहीतरी सुरू करायचं होत. नाशिकला फिरायला गेल्यावर त्यांनी पाच चवींची पाणीपुरी चाखली आणि ती खूप आवडली. त्याच अनुभवातून त्यांना नवा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.
विशाखा सांगतात, नाशिकला गेल्यावर पाच चवींची पाणीपुरी खाल्ली. खूप आवडली. त्याच वेळी आम्ही ठरवलं की काहीतरी वेगळं करायचं. म्हणूनच 'वाह पाणीपुरी'ची सुरुवात केली. सध्या या व्यवसायातून त्यांना चांगला नफा मिळत असून पाणीपुरी प्रेमींमध्ये त्यांचा स्टॉल लोकप्रिय झाला आहे.





