टस फिट हे रेस्टॉरंट फक्त हेल्दीच नव्हे, तर चविष्ट पदार्थांसाठीही ओळखलं जातं. टस फिटचं सगळ्यात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे इथे पारंपरिक स्ट्रीट फूडला एक हेल्दी ट्विस्ट दिला जातो. तुम्हाला इथे खिमा पाव मिळेल पण नेहमीसारखा नव्हे. इथला खिमा ऑलिव ऑइल मध्ये बनवला जातो तसेच जो पाव असतो तो बनतो मल्टीग्रीन पाव आहे. ज्यात फायबर्स जास्त आणि अजिबात मैदा नाही हा खिमा पाव 239 चा आहे. त्याचप्रमाणे इथला पास्ता सुद्धा ग्लुटेन फ्री आहे. मैद्याचा वापर न करता खास हेल्दी घटकांपासून बनवलेला हा पास्ता स्वादिष्ट असूनही पचायला हलका आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे हा पास्ता फक्त 349 ला आहे. तसेच चिकन व्रेप 259 ला आहे. व्हेज पिझ्झा 349 ला आहे.
advertisement
डोसा म्हटलं की 'वाह'! आजच घरच्या घरी बनवा झक्कास म्हैसूर मसाला डोसा, जाणून घ्या रेसिपी
टस फिटमध्ये अजून काय मिळतं?
प्रोटीन रिच सूप्स, सुपरफूड्सने भरलेली सलाड्स, लो कॅलोरी स्मूदीज शुगर फ्री डेझर्ट्स हे पदार्थ मिळतील.
जर तुम्हाला हेल्दी खाणं आणि चव यांचा परफेक्ट बॅलन्स हवा असेल, तर टस फिटला एकदा नक्की भेट द्या. दादरच्या गडबडीतसुद्धा इथे एक वेगळीच शांतता आणि आरोग्यदायी अनुभव तुम्हाला मिळेल.