नेहमीच्या कांदा-भजीला पर्याय असे हे फुरफूरे वडे अगदी काही मोजक्या साहित्यात बनतं. नाव जरी विचित्र वाटत असलं तरी त्याची कृती खूप सोपी आहे. ही रेसिपी खूप जुनी आहे. जी आता काही लोकांना माहितीही नसेल. काही लोकांनी त्याचं नाव ऐकलं असेल, वाचलं असेल पण कधी बघितलं नसेल किंवा पाहिलं असेल. आता तुम्हालाही हे नाव वाचून ही रेसिपी काय आहे? कशी बनवायची? हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल. तर आता बिलकुल वेळ न घेता थेट फुरफूरे वड्यांसाठी लागणारं साहित्य आणि त्याची कृती पाहुयात.
advertisement
Recipe Video : शेपूची भाजी माहिती असेल कधी खाल्लीत का शेपूची फळं; आवडत नसली तरी आवडीने खाल
फुरफूरे वड्यांसाठी साहित्य
एक वाटी गव्हाचं पीठ
अर्धी वाटी दही
रॉक सॉल्ट
बारीक चिरलेलं आलं
बारीक चिरलेला लसूण
बारीक चिरलेली हिरवी मिरची
बारीक चिरलेली कोथिंबीर
बारीक चिरलेला कांदा
तळण्यासाठी तेल
फुरफूरे वडे कसे बनवायचे? कृती
गव्हाचं पीठ आणि दही थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्या, चांगलं घोटून घ्या. आता भांड्यावर झाकण ठेवून हे मिश्रण 3-4 तास उबदार ठिकाणी आंबवत ठेवा. काही वेळाने मिश्रण फुललेलं दिसेल.
आता या मिश्रणात यात रॉक सॉल्ट, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेलं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा टाकून मिक्स करून घ्या.
Kitchen Tips : कांदेपोहे बनवताना पोहे पाण्यात किती वेळ भिजवायचे? शेफने सांगितला परफेक्ट टाइम
एका कढईत तेल गरम करा. एक छोटा चमचा पाण्यात बुडवून घ्या. भांड्यातील मिश्रण थोडं थोडं करू चमच्यात घेऊन तेलात सोडा आणि मंद आचेवर वडे तळून घ्या.
हे वडे तेलात फुरफूर असा आवाज येतो म्हणून ते फुरफूरे वडे. अगदी टम्मं फुकतात आणि बाहेरून क्रिस्पी आतून नरम असतात. शेफ विष्णू मनोहर यांनी त्यांच्या मास्टर रेसिपीज या युट्यूब चॅनेलवर हा रेसिपी व्हिडीओ पोस्ट केला आहे.
तुम्ही कधी हे फुरफूरे वडे केले होते का? खाल्ले होते का? नाहीतर एकदा करून पाहा आणि कसे झाले आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
