हातकागद संस्था खादी ग्रामोद्योग पुणे यांनी कागदाच्या लगद्यापासून गणेश मूर्ती तयार केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कागदापासून बनवलेल्या या मूर्ती विशेष आकर्षण ठरत आहेत. या संस्थेचे संचालक दिनेश लोहपात्रे यांनी या मूर्तीबाबत सविस्तर माहिती दिली.
बाप्पाच्या सजावटीसाठी बजेटचं टेन्शन सोडा, मुंबईच्या या बाजारपेठेत मिळतात 20 रुपयांपासून वस्तू
advertisement
'आमच्या संस्थेत गेल्या 2 वर्षांपासून कागदावर वेगवेगळे प्रयोग करून त्यापासून मूर्ती बनवल्या जातात. यामध्ये 80 ते 90 टक्के कागद आणि 10 ते 20 टक्के शाडू असं प्रमाण असतं. ज्याप्रमाणे पीओपीच्या मूर्तींंमध्ये शाडूची माती वापरली जाते त्याचपद्धतीनं कागदामध्ये शाडूच्या मातीचा वापर करुन हा प्रयोग केला आहे,' असं त्यांनी सांगितलं.
या मूर्ती वजनाला अतिशय हलक्या आहेत. शाडू मातीच्या गणपती मूर्तींपेक्षा कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्तींची स्ट्रेंथ जास्त असते. शाडू मातीच्या मूर्ती हाताळताना अतिशय काळजी घ्यावी लागते याउलट कागदाच्या बनवलेल्या या गणेश मूर्ती हाताळण्यास सहज आणि सोप्या आहे. त्याचबरोबर दोन ते तीन तासांमध्ये कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या गणपती मूर्तींचे विघटन होते.
नागपुरातील ही प्रसिद्ध शिव मंदिरं माहितीयेत का? श्रावणात नक्की घ्या दर्शन
या मूर्तींमध्ये पाण्याचे किंवा इतर कोणतेही प्रदूषण होत नाही. गदाचा लगदा, शाडू माती, डिंक आणि कागदावरचे रंग एवढेच काय ते गणेश मूर्ती बनवण्यासाठी लागते, अशी माहिती लोहपात्रे यांनी दिली.