बाप्पाच्या सजावटीसाठी बजेटचं टेन्शन सोडा, मुंबईच्या या बाजारपेठेत मिळतात 20 रुपयांपासून वस्तू

Last Updated:

गणेशोत्सवाच्या सजावटीची तयारी आता सुरू केली असेल. तर मुंबईतील या मार्केटमध्ये स्वस्तात सजावटीचं साहित्य मिळतंय.

+
इथं

इथं 20 रुपयांपासून मिळतंय सजावटीचं साहित्य, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?

मुंबई, 4 सप्टेंबर: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची मुंबईकर नक्कीच जयत तयारी करत आहेत. गणेशोत्सवात आपले डेकोरेशन आणखीन सुरेख कसे दिसेल याचा विचार करत लोक वेगवेगळ्या थीम्स शोधत आहेत. त्यातच गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी लागणारे सामान मुंबईमध्ये आपल्याला स्वस्त दरात कुठे मिळेल? याचा शोध सर्वचजण घेत असतात. सध्या सर्वात सोपे डेकोरेशन म्हणजेच फुलांच्या आणि वेलींच्या सजावटीला भाविक प्राधान्य देत आहेत. या फुलांच्या सजावटीसाठी लागणारे नकली फुलं, वेली आणि फुलांचा गुच्छा आपल्याला मुंबईच्या प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटमध्ये मिळतील.
प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केट
मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटमध्ये अनेक प्रकारचे आर्टिफिशल फुले मिळतात. अगदी खरोखर दिसणारे हे पानफुल गणपतीच्या सजावटीसाठी एक उत्तम पर्याय आहे. जे लोक पर्यावरणाचा विचार करतात व फक्त कुठल्या सणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये अशी इच्छा असणाऱ्या लोकांसाठी हे आर्टिफिशल कपड्यांनी बनलेले फुले एक सर्वोत्तम पर्याय आहे. येथे मिळणाऱ्या आर्टिफिशियल फुलवेलींची किंमत ही 20 रुपयांपासून सुरू होते. लोहार चाळीतील हे आर्टिफिशियल फुलांचे दुकान आलम उमर खान हे सांभाळतात. जास्त प्रमाणात खरेदी केल्यास येथे खरेदी दारांना सूट देखील मिळते.
advertisement
आर्टिफिशियल फुलावेलींचे वैशिष्ट्य
मुंबईच्या या प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केट परिसरात असलेले हे हलीमा फ्लॉवर दुकान आर्टिफिशियल फुलवेलींसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी 20 रुपयात तुम्हाला फुलांचा एक गुच्छ खरेदी करता येईल. वेगवेगळ्या प्रकारच्या पानांच्या लढी या ठिकाणी 300 रुपये डझन व 25 रुपये प्रति लड अशी खरेदी करता येईल. त्याचबरोबर बॅक ड्रॉप साठी लागणारे चना मॅट म्हणजेच वेलींचे चौकोनी मॅट या ठिकाणी 75 रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत खरेदी करता येतील, अशी माहिती दुकानाचे मालक आलम उमर खान यांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
बाप्पाच्या सजावटीसाठी बजेटचं टेन्शन सोडा, मुंबईच्या या बाजारपेठेत मिळतात 20 रुपयांपासून वस्तू
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement