घरातील ज्येष्ठ व्यक्ती नेहमी सांगतात की, लहान मुलांना तूप खायला दिलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या शरीरातील हाडं मजबूत होतील. अनेक पोषक घटक असलेलं तूप हे एक सुपरफूड आहे. त्यामुळे पोट निरोगी राहतं आणि त्यात गूड फॅट्सदेखील असतात. अनेक संशोधनांतून असं समोर आलं आहे की, लहान मुलं दररोज तूप खाऊ शकतात. कारण तुपामुळे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी होतं.
advertisement
तुपाप्रमाणे लोणी देखील आरोग्यासाठी चांगलं असतं. पण, ते साधं लोणी म्हणजे ज्यात मीठ नसतं ते पांढरं लोणी असलं पाहिजे. पांढरं लोणी घरगुती दुधापासून तयार केलं जातं. लोणी काढून शिल्लक राहिलेलं पाणी तुम्ही ताक किंवा इतर कोणत्याही स्वरूपात वापरू शकता. मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या लोण्यावर प्रक्रिया करून त्यात मीठ मिसळलेलं असतं. जेणेकरून ते बराच काळ टिकेल. हे लोणी आरोग्यासाठी चांगलं नसतं.
तूप आणि लोण्याची तुलना केल्यास दोन्हींमध्ये भरपूर पोषक घटक असतात. तुपामध्ये हेल्दी फॅट्ससह व्हिटॅमिन ए, ओमेगा 3 फॅटी अॅसिड्सही असतात. फोर्टिफाइड लोण्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं.
प्रति 100 ग्रॅम लोण्यामध्ये 71 टक्के हेल्दी फॅट्स, 3 ग्रॅम अनहेल्दी फॅट्स आणि 717 किलोकॅलरी असतात. 100 ग्रॅम तुपामध्ये 60 टक्के हेल्दी फॅट्स आणि 900 किलो कॅलरी असतात. तुपात अनहेल्दी फॅट्स नसतात. दुकानातून तूप खरेदी करताना लेबल नीट वाचलं पाहिजे. कारण, जर त्यात 'वनस्पती तूप' असा उल्लेख असेल तर ते पारंपरिक तूप नसतं. त्यात अनहेल्दी फॅट्स असण्याची शक्यता आहे.
तूप आणि लोण्याची चव खूप वेगळी असते. म्हणूनच ते खूप वेगळ्या प्रकारे वापरले जातात. भारतात, सर्व प्रकारच्या करी, डाळ आणि मांसाचे पदार्थ शिजवण्यासाठी तुपाचा वापर केला जातो. विशेष प्रसंगी पुरी आणि पराठे तळण्यासाठी, रव्याचा शिरा आणि गाजराचा हलवा बनवण्यासाठीदेखील याचा वापर केला जातो. कारण, उच्च तापमानातही तुपात पदार्थ शिजवता येतात.
लोण्याचा वापर व्हाईट सॉस किंवा बेचेमेल सारखे इन्स्टंट सॉस बनवण्यासाठी केला जातो. भाजीपाला विशेषत: मासे, कोळंबी आणि खेकडे यांसारखे झटपट शिजणारे पदार्थ बनवताना लोणी हा एक उत्तम पर्याय आहे. लोण्यामुळे मांसाला चांगली चव येते. लसूण व इतर सिझनिंगमध्ये लोणी मिसळल्यानंतर चव आणखी चांगली होते.