अशी राहिली मका आवक
राज्याच्या कृषीमार्केटमध्ये आज एकूण 21 हजार 658 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी जळगाव मार्केटमध्ये 7 हजार 095 क्विंटल लाल मक्याची सर्वाधिक आवक झाली. त्यास मक्याच्या प्रतीनुसार कमीत कमी 1225 ते जास्तीत जास्त 1651 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 339 क्विंटल मक्यास 2800 ते 3500 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
कांद्याची उच्चांकी आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख 65 हजार 531 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 92 हजार 531 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 277 ते जास्तीत जास्त 1439 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या 449 क्विंटल कांद्यास प्रतीनुसार 1000 ते 2000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये 17 हजार 012 क्विंटल कांद्याची सर्वात कमी आवक होऊन त्यास कमीत कमी 100 ते जास्तीत जास्त 2200 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला.
सोयाबीन उत्पादकांची कोंडी
राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख 13 हजार 613 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी जालना मार्केटमध्ये सर्वाधिक 30 हजार 423 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3443 ते 4261 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या 415 क्विंटल सोयाबीनला 3820 ते 4225 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये सर्वात कमी 26 क्विंटल सोयाबीनची सर्वात कमी आवक होऊन त्यास 3051 ते 3725 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला.