कधीकधी ही समस्या इतकी गंभीर होते की टाळूवर लालसरपणा, सूजू आणि कवच तयार होऊ लागते. या स्थितीला सेबोरेहिक डर्माटायटीस असंही म्हणतात.
टाळूला खाज येण्याची कारणं- कोंडा, टाळूवर गाठी होणं, डोक्यात उवा होणं, स्काल्प रिंगवर्म, स्काल्प सोरायसिस, अॅटोपिक डर्मेटायटिस या कारणांमुळे टाळूला खाज येते.
Exercise : शरीराला अंतर्बाह्य मजबूत करणारे व्यायाम, रोज व्यायाम करा, सुदृढ व्हा, राहा चिरतरुण
advertisement
टाळूला खाज येण्याची लक्षणं - टाळूची त्वचा कोरडी होणं. जळजळ आणि लालसरपणा जाणवणं. सूज येणं. टाळूवर पांढरं कवच तयार होणं. पू भरलेल्या जखमा होणं. केस गळणं किंवा टक्कल पडणं.
टाळूची खाज घालवण्यासाठी घरगुती उपाय
टाळूसाठी दह्याचा वापर - आठवड्यातून तीन-चार वेळा टाळूला दह्यानं हलका मसाज करा. यामुळे खाज कमी होईल आणि केसांना नैसर्गिक चमक येईल.
केसांतला कोंडा घालवण्यासाठी तेलांचं मिश्रण - एरंडेल तेल, खोबरेल तेल आणि मोहरीचं तेल समान प्रमाणात मिसळा आणि टाळूला मालिश करा. तेलांचं मिश्रण रात्रभर राहू द्या आणि सकाळी धुवा. यामुळे डोक्यातील कोंडा आणि खाज दोन्ही कमी होईल.
नैसर्गिकरित्या टाळूची काळजी घेण्यासाठी कांद्याचा रस वापरा - कांद्याचा रस कापसाच्या मदतीनं टाळूवर लावा आणि वीस मिनिटं तसंच राहू द्या. त्यानंतर केस धुवा. कांद्यातल्या सल्फरमुळे संसर्ग आणि खाज कमी होते.
कडुनिंब आणि जास्वंदाचं पाणी - हा कोंडा घालवण्यासाठीचा घरगुती उपाय आहे. कडुनिंब आणि जास्वंदाची पानं पाण्यात उकळा आणि त्या पाण्यानं केस धुवा. या नैसर्गिक उपायानं केस निरोगी होतात आणि खाज कमी होते.
Folic Acid : फॉलिक अॅसिडच्या कमतरतेमुळे होतं शरीराचं गंभीर नुकसान, जाणून घ्या कारणं, उपचार
नारळ तेल आणि कापूर - नारळ तेलात थोडा कापूर मिसळा आणि डोक्याला मालिश करा. यामुळे केवळ खाज येणार नाही आणि संसर्गही कमी होईल.
लिंबाचा रस - लिंबातलं सायट्रिक ड मुळे टाळू स्वच्छ राहतो आणि कोंडा कमी होऊन खाज कमी होते.
व्हिनेगर - थोड्या पाण्यात व्हिनेगर मिसळा आणि ते टाळूवर लावा आणि काही मिनिटांनी धुवा. यामुळे डोक्यातील कोंडा आणि खाज सुटण्यापासून त्वरित आराम मिळतो.
टाळूची खाज आणि डोक्यातील कोंडा याकडे दुर्लक्ष करु नका. घरगुती उपायांचा अवलंब केला तर ही समस्या लवकर नियंत्रणात येऊ शकते. केस नियमित धुणं, तेल मालिश करण्यानं केस निरोगी आणि चमकदार राहतील.