केसांची चांगली वाढ, जाडपणा आणि केस गळणं यासारख्या समस्यांमधे, योग्य पद्धत कोणती हा प्रश्न अधिक महत्त्वाचा बनतो. रात्री झोपण्यापूर्वी तेल लावणं फायदेशीर मानलं जाते. झोपत असताना, ते तेल तुमच्या केसांत, आणि टाळूपर्यंत पोहचतं. ज्यामुळे मुळांना पोषण मिळतं आणि केस मऊ, चमकदार आणि मजबूत होतात.
Bad Breath : मुख दुर्गंधीवर कायमस्वरुपी इलाज, या पाच टिप्स ठरतील उपयोगी
advertisement
याव्यतिरिक्त, तेल लावल्यानं टाळूला मालिश होतं, ज्यामुळे रक्ताभिसरण वाढतं आणि केसांच्या वाढीस मदत होते. पण तेल जास्त काळ लावल्यानं धूळ आणि घाण टाळूवर चिकटू शकते, ज्यामुळे डोक्यातील कोंडा आणि केस गळू शकतात. म्हणून, रात्रभर तेल लावलं असेल तर सकाळी ते शाम्पूनं पूर्णपणे स्वच्छ करणं महत्वाचं आहे.
दररोज तेल लावल्यानं आठवड्यातून दोन-तीन वेळा लावण्याइतके फायदे मिळत नाहीत. दररोज तेल लावल्यानं आणि नंतर बाहेर पडल्यानं टाळूवर धूळ जमा होऊ शकते. यामुळे टाळू अस्वच्छ होऊ शकतो आणि केस गळण्याचं प्रमाण वाढू शकतं. आठवड्यातून फक्त दोन-तीन वेळा हलका मसाज करणं हा चांगला पर्याय आहे.
नारळ तेल - नारळाचं तेल हा सर्वात जुना आणि सर्वात प्रभावी उपाय आहे. हे तेल मुळांमधे खोलवर जाऊन पोषण करतं आणि केस फुटण्यापासून रोखतं.
Brain Fog : ब्रेन फॉगवर उपचार शक्य आहेत का ? जाणून घ्या लक्षणं, कारणं, उपचारपद्धती
आवळा तेल: केस काळे, जाड आणि मजबूत करण्यासाठी सर्वोत्तम आहे.
एरंडेल तेल: या तेलातले फॅटी अॅसिड केसांच्या वाढीला प्रोत्साहन देतात आणि जाड होण्यास मदत करतात.
भृंगराज तेल: आयुर्वेदिकदृष्ट्या केसांच्या वाढीसाठी सर्वोत्तम उपाय मानला जातो.
रात्रभर तेल लावायचं असेल तर सकाळपर्यंत म्हणजे सहा-आठ तास पुरेसे आहेत. रात्रभर तेल लावल्यानं केस गळतात का असा प्रश्न विचारला जातो. केस वेळेवर धुतले नाहीत तर तेल आणि धुळीच्या कणांमुळे छिद्र बंद होऊ शकतात, ज्यामुळे केस गळतात. तेल लावल्यानंतर वेळेवर केस धुतले तर केस गळण्याची समस्या राहणार नाही आणि ते आणखी मजबूत होतील.