पचनक्रिया कमकुवत असते तेव्हा अन्न व्यवस्थित पचत नाही. ज्यामुळे अतिसार, अपचन, गॅस आणि अशक्तपणा यासारख्या समस्या उद्भवतात. या कमकुवत पचनाची अनेक कारणं असू शकतात. अस्वच्छ, जास्त तळलेलं आणि शिळं अन्न खाण्यामुळे पचनक्रियेच्या कामात बिघाड होतो.
कमकुवत पचनसंस्थेमुळे अनेकदा पोट बिघडतं. निरोगी शरीरासाठी पचनक्रिया चांगली राखणं आवश्यक आहे.
Skin Care : निरोगी आहार, योग्य पोषण - चेहऱ्यावरच्या ग्लोसाठी वाचा आहारतज्ज्ञांचा सल्ला
advertisement
कमजोर पचनक्रियेमुळे गॅस आणि कधीकधी जुलाब होऊ शकतात, ज्यामुळे वारंवार बाथरूमला जावं लागतं. म्हणून, या काळात जड जेवण खाणं टाळा. खिचडी, ताक आणि जिऱ्याचं पाणी असं हलकं जेवण खा. या काळात मसालेदार, तळलेले किंवा शिळे पदार्थ टाळा.
पचनसंस्था मजबूत ठेवण्यासाठीचे पर्याय -
हिरव्या भाज्या खा - हिरव्या भाज्यांमधे आढळणारे पोषक घटक पचनसंस्था मजबूत करतात. त्यामुळे आहारात पालेभाज्यांचा समावेश करा. दिवसातून किमान एक हिरवी भाजी खा. नियमितपणे हिरव्या भाज्या खाल्ल्यानं पचनसंस्था योग्यरित्या कार्य करण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त, दररोज एक फळ नक्की खा.
Dark Circles : डोळ्याखालची काळी वर्तुळं कमी करण्यासाठी हे उपाय करुन पाहा, चेहरा दिसेल फ्रेश
प्रथिनयुक्त आहार - पचनसंस्था मजबूत करण्यासाठी आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा. दही, दूध आणि अननस यांचे सेवन करा. तसंच, फायबरयुक्त पदार्थ खा.
भरपूर पाणी प्या - पुरेसं पाणी शरीरासाठी आवश्यक आहे, त्यासाठी किमान दहा ग्लास पाणी प्यावं. कमी पाणी पित असाल तर ही सवय बदला. खूप कमी पाणी प्यायल्यानं पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो.
योगासनं - योगासनं आणि प्राणायाममुळेही पचनसंस्था मजबूत होऊ शकते. पवनमुक्तासन, वज्रासन, अग्निसार क्रिया आणि अनुलोम-विलोम प्राणायाम यामुळे योग्य पचनक्रिया वाढवतात.