Dark Circles : डोळ्याखालची काळी वर्तुळं कमी करण्यासाठी हे उपाय करुन पाहा, चेहरा दिसेल फ्रेश

Last Updated:

काळी वर्तुळं कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय उपयुक्त ठरतात. डॉ. हंसाजी यांनी यासाठी कच्चा बटाटा, ग्रीन टी बॅग्ज, टोमॅटो आणि बेसनाची पेस्ट असे काही प्रभावी उपाय कसे करावेत याविषयीची माहिती दिली आहे.

News18
News18
मुंबई : डोळ्यांखाली काळी वर्तुळं ही अनेकांना भेडसावणारी समस्या. अपुरी झोप हे त्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण. काळ्या वर्तुळांमुळे चेहरा निस्तेज दिसतो. अनेकदा मेकअप केल्यानंतरही काळी वर्तुळं स्पष्टपणे दिसतात.
काळी वर्तुळं कमी करण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय पाहूयात. डॉ. हंसाजी यांनी यासाठी कच्चा बटाटा, ग्रीन टी बॅग्ज, टोमॅटो आणि बेसनाची पेस्ट असे काही प्रभावी उपाय कसे करावेत याविषयीची माहिती दिली आहे.
advertisement
कच्चा बटाटा
कच्च्या बटाट्यात नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात. त्यातले कॅटालेस एंजाइम पिग्मेंटेशन आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. एक बटाटा किसून घ्या आणि त्याचा रस पिळून घ्या. त्यात कापूस भिजवा आणि डोळ्यांवर दहा-पंधरा मिनिटं ठेवा. थंड बटाट्याचा रस आणखी प्रभावी ठरतो.
advertisement
ग्रीन टी बॅग्ज
टी बॅग्ज रेफ्रिजरेटरमधे थंड करून डोळ्यांवर ठेवल्यानं सूज आणि काळी वर्तुळं दोन्ही कमी होतात. ग्रीन टीमधील अँटीऑक्सिडंट्समुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि डोळे फ्रेश वाटतात.
कोरफड आणि व्हिटॅमिन ई नाईट जेल
झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली कोरफड जेल आणि व्हिटॅमिन ई तेलाचं मिश्रण लावल्यानं त्वचा खोलवर मॉइश्चरायझ होते. रात्रीच्या वेळी केलेल्या या उपचारानं त्वचेची दुरुस्ती होते आणि काळी वर्तुळं हळूहळू कमी होतात.
advertisement
टोमॅटो आणि बेसन पेस्ट
या व्यतिरिक्त, टोमॅटो आणि बेसनची पेस्ट मिसळून डोळ्यांखाली लावू शकता. टोमॅटोमधील लायकोपिनमुळे त्वचा उजळते. त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी बेसन प्रभावी आहे.
टोमॅटोचा रस, बेसन आणि काही थेंब थंड दूध मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट डोळ्यांखाली दहा मिनिटं लावा आणि नंतर धुवा. यामुळे रंगद्रव्य कमी होण्यास मदत होते आणि त्वचेचा रंग त्वरित उजळतो.
advertisement
काळी वर्तुळं एका रात्रीत पूर्णपणे नाहीशी होत नाहीत. म्हणून, हे उपाय नियमितपणे करणं महत्वाचं आहे. याव्यतिरिक्त, निरोगी आहार आणि पुरेशी झोप घेणं अत्यंत महत्वाचं आहे. या सर्वांव्यतिरिक्त, ताण व्यवस्थापन खूप आवश्यक आहे. या सोप्या उपायांमुळे नैसर्गिकरित्या काळी वर्तुळं दूर होऊ शकतील आणि त्वचेची हरवलेली चमक परत येईल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dark Circles : डोळ्याखालची काळी वर्तुळं कमी करण्यासाठी हे उपाय करुन पाहा, चेहरा दिसेल फ्रेश
Next Article
advertisement
Vinod Ghosalkar On Tejasvee Ghosalkar: तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांगितलं...
तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग
  • तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग

  • तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग

  • तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग

View All
advertisement