Skin Care : निरोगी आहार, योग्य पोषण - चेहऱ्यावरच्या ग्लोसाठी वाचा आहारतज्ज्ञांचा सल्ला

Last Updated:

त्वचा नैसर्गिकरित्या निरोगी, चमकदार आणि तरुण दिसावी असं वाटत असेल, तर डाळिंब, पिस्ता, केशर, कोरफड गर, नारळ पाणी या नैसर्गिक घटकांचा आवर्जून समावेश करा.

News18
News18
मुंबई : चेहरा सुंदर आणि फ्रेश दिसावा असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी महागड्या उत्पादनांचा आणि उपचारांचा वापर करण्याआधी या टिप्स वाचा
त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर दिसण्यासाठी निरोगी आहार आणि योग्य पोषण महत्त्वाचं आहेत. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी इंस्टाग्राम पोस्टमधे यासाठी पाच महत्त्वाचे मुद्दे शेअर केले आहेत.
डाळिंब - डाळिंब हे त्वचेसाठी एक सुपरफूड मानलं जातं. त्यात व्हिटॅमिन सी आणि प्युनिकलागिन असतं. यामुळे कोलेजन वाढतं आणि त्वचा घट्ट आणि निरोगी राहते. डाळिंबामुळे त्वचेचं अतिनील किरणांपासून संरक्षण होतं. डाळिंबातील एलाजिक एसिड ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करून त्वचेचा रंग एकसमान ठेवण्यास मदत करतं.
advertisement
नारळ पाणी आणि मलई - नारळ पाणी हे एक नैसर्गिक हायड्रेटर आहे. त्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे इलेक्ट्रोलाइट्स असतात, यामुळे शरीर आणि त्वचेला पुरेसं हायड्रेटेशन मिळतं. दरम्यान, नारळाच्या मऊ मलईमधील घटकांमुळे त्वचेची लवचिकता आणि नैसर्गिक चमक वाढते.
advertisement
कोरफड गर - कोरफडीत आढळणारे एसेमनन हे रासायनिक संयुग जखमा बऱ्या करण्यासाठी महत्त्वाचं आहे यामुळे त्वचेतला ओलावा टिकून राहतो. कोरफडीचा वापर नियमित केल्यानं त्वचा मऊ, आणि शांत होते.
पिस्ता - पिस्ता स्वादिष्ट आहे आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर देखील आहे. त्यात व्हिटॅमिन ईचं प्रमाण चांगलं असते, यामुळे त्वचा तरुण आणि तेजस्वी राहते. दररोज आहारात, पिस्ता खाणं त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम ठरू शकतं.
advertisement
केसर - निरोगी त्वचेसाठी केसर हे नैसर्गिक टॉनिक मानलं जातं. त्यात क्रोसिन आणि सॅफ्रानलसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो आणि त्वचेला निरोगी आणि नैसर्गिक चमक मिळते.
त्वचा नैसर्गिकरित्या निरोगी, चमकदार आणि तरुण दिसावी असे वाटत असेल, तर तुमच्या दैनंदिन आहारात या पाच गोष्टींचा नक्कीच समावेश करा.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : निरोगी आहार, योग्य पोषण - चेहऱ्यावरच्या ग्लोसाठी वाचा आहारतज्ज्ञांचा सल्ला
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement