आजीच्या काळापासून ते आजच्या आधुनिक सौंदर्यप्रसाधनांपर्यंत, गुलाबपाणी हे वापरलं जातं. गुलाबजलाच्या सुगंधानं मन शांत होतं आणि गुलाबजलाच्या गुणधर्मांमुळे त्वचेला ताजेपणा आणि ओलावा मिळतो. पण जितके फायदे आहेत तितकेच त्याचे काही तोटे देखील होऊ शकतात. यासाठी गुलाबजलाचा योग्य प्रकारे वापर करणं गरजेचं आहे.
Skin Care : रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा तूप, वाचा गुणकारी तुपाचे आरोग्यदायी फायदे
advertisement
- गुलाबपाण्यानं त्वचा मॉइश्चरायझ राहते आणि यामुळे कोरडेपणा दूर होतो. गुलाबपाणी नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते.
- गुलाबपाण्यानं त्वचेला थंडावा मिळतो. उन्हाळ्यात गुलाबपाणी लावल्यानं चेहरा थंड राहतो आणि जळजळ किंवा पुरळ यापासून आराम मिळतो.
- गुलाबपाणी हे एक उत्कृष्ट नैसर्गिक टोनर आहे. यामुळे त्वचा स्वच्छ राहते.
- गुलाबपाण्यातल्या अँटीसेप्टिक गुणधर्मांचा वापर मुरुमं कमी करण्यासाठी आणि त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी होतो.
Sugar : साखरेशी मैत्री तोडा, नाहीतर मेंदू होईल कमकुवत, वाचा संशोधनातली महत्त्वाची माहिती
- गुलाब पाण्यातल्या अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा तरुण ठेवण्यासाठी आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत होते.
गुलाबपाण्याचे तोटे -
- काही जणांची त्वचा संवेदनशील असते. गुलाबपाणी लावल्यानं काहींना त्वचेवर जळजळ होते किंवा पुरळ उठू शकतं.
- बाजारात अनेक बनावट किंवा रासायनिकयुक्त गुलाबपाणी उपलब्ध आहे. त्यापासून सावध राहा. कारण यामुळे त्वचेला हानी पोहोचू शकते.
- प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी गुलाबपाणी उपयुक्त ठरेल असं नाही. काहींची त्वचा खूप तेलकट किंवा खूप कोरडी असते. अशा त्वचेसाठी गुलाबपाणी उपयुक्त नाही.