मनुका नुसत्या तसंच पाण्यात किंवा दुधात भिजवून खाणं अधिक फायदेशीर आहे. त्वचेसाठी, अशक्तपणा घालवण्यासाठी, उच्च रक्तदाब आणि श्वसनाच्या समस्यांमधून आराम देण्यासाठी मनुका उपयुक्त आहेत.
Hair Care : नैसर्गिक उपायांनी करा केस काळे, आवळा, कडिपत्ता, लिंबाचा होईल उपयोग
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, मनुकांमधे असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेचा रंग सुधारण्यासाठी, सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावण्यास मदत करतात.
advertisement
8-10 मनुका रात्रभर भिजवून सकाळी खाल्ल्यानं त्वचा चमकदार आणि निरोगी राहते.
अशक्तपणा दूर करण्यासाठी उपयुक्त
स्त्रिया आणि मुलांमधे अनेकदा अशक्तपणा अधिक दिसून येतो. मनुकांमधे लोह भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी मनुकांची मदत होते. भिजवलेल्या मनुकांचं पाणी प्यायल्यानं अशक्तपणाची समस्या कमी होते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
रोगप्रतिकारक शक्ती आणि हाडांसाठी फायदेशीर
मनुकांमधे व्हिटॅमिन-सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणं आणि शरीराला रोगांशी लढण्यासाठी यामुळे मदत होते. यात आढळणारं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडं आणि दात मजबूत करतात. थकवा आणि अशक्तपणामधेही मनुका फायदेशीर आहेत.
Probiotics : पचनव्यवस्थेसाठी प्रोबायोटिक्स का महत्त्वाचं ? दही किंवा ताकाचं सेवन कधी करावं ?
उच्च रक्तदाब आणि श्वसनाच्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी मनुकांचं पाणी वरदान आहे. मनुका पाण्यात उकळून प्यायल्यानं रक्तदाब नियंत्रणात राहतो. विशेषतः हिवाळ्यात, मनुकांमुळे फुफ्फुसांना बळकटी मिळते आणि श्वासोच्छवासाच्या समस्या दूर होतात.
केस आणि त्वचेची निगा
चरक संहितेनुसार, मनुकांत असलेलं व्हिटॅमिन-बी आणि लोहामुळे केस गळती थांबते आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते. मनुका नियमित खाल्ल्यानं केस जाड आणि मजबूत होतात.
मनुका हा आरोग्यासाठीचा मोठा खजिना आहे. दैनंदिन आहारात मनुका खाल्ल्यानं त्वचा, केस, रोगप्रतिकारक शक्ती आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकतं.
