आपल्याकडे शेवग्याच्या शेंगा अनेक प्रकारे वापरल्या जातात. शेंगांचं सूपही आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. जाणून घेऊया.
पोषक घटकांचं पॉवरहाऊस - शेवग्याच्या शेंगांमधे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि मॅग्नेशियम सारखी आवश्यक जीवनसत्त्वं आणि खनिजं, प्रथिनंही भरपूर प्रमाणात असतात. अँटिऑक्सिडंट गुणधर्मही यात मोठ्या प्रमाणात असतात. म्हणूनच शेवग्याच्या शेंगांचं सूप नियमितपणे प्यायल्यानं शरीराला असंख्य फायदे मिळतात.
advertisement
Baking Soda :खाण्याबरोबरच त्वचेसाठीही उपयुक्त, जाणून घ्या बेकिंग सोड्याचे उपयोग
रोगप्रतिकारक शक्ती - शेवग्याच्या शेंगांचं सूप हे व्हिटॅमिन सीचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. व्हिटॅमिन सी पांढऱ्या रक्त पेशींच्या उत्पादनाला चालना देऊन आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. हवामानातील बदल किंवा संसर्गादरम्यान हे सूप प्यायल्यानं शरीराची आजारांशी लढण्याची क्षमता वाढते आणि सर्दी आणि फ्लूसारख्या समस्या टाळता येतात.
हाडांच्या बळकटीसाठी एक वरदान - शेवग्याच्या शेंगांमधे दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असतं. त्यात लोह आणि फॉस्फरस देखील असतं, हे घटत हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.
शेवग्याच्या शेंगांचं सूप नियमित प्यायल्यानं ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांचा धोका कमी होतो, हाडं मजबूत होतात आणि संधिवाताच्या वेदना कमी होतात. हे विशेषतः वाढत्या मुलांसाठी आणि वृद्धांसाठी फायदेशीर आहे.
पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत - या सूपमधे भरपूर फायबर असतं, यामुळे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत होते. बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यासारख्या समस्या यामुळे कमी होतात.
शेवग्याच्या शेंगांमधे बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंध करणारे गुणधर्म देखील आहेत. यामुळे पोटात हानिकारक जीवाणूंची वाढ रोखणं आणि आतड्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते.
Cracked Heels : टाचेच्या भेगांमागे असू शकतं हे कारण, जाणून घ्या कशी घ्यायची काळजी
जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त - शेवग्याच्या शेंगांमधले दाहक-विरोधी गुणधर्म शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून देखील काम करतात, यामुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते, यकृत आणि मूत्रपिंड निरोगी राखण्यासाठी या शेंगा फायदेशीर आहेत.
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर - या सूपमधे असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ए त्वचेला निरोगी आणि चमकदार ठेवतात. यामुळे चेहऱ्याच्या सुरकुत्या आणि बारीक रेषा रोखण्यास मदत होते. केस गळणं कमी करण्यास देखील यामुळे मदत होते, यामुळे केस मजबूत आणि जाड होतात.
