Cracked Heels : तळव्यांना भेगा का पडतात ? टाचांसाठी कोणते उपाय करायचे ?

Last Updated:

तुमच्या टाचांना वारंवार भेगा पडत असतील तर, यामागे आवश्यक पोषक घटकांची कमतरता हे कारणही असू शकतं. टाचांना भेगा पडण्याचं एक प्रमुख कारण व्हिटॅमिन ई आणि झिंकची कमतरता असू शकते. व्हिटॅमिन ई त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी आणि त्वचेचं आरोग्य राखण्यास मदत करते. या जीवनसत्वाची कमतरता असते तेव्हा त्वचा कोरडी होते आणि टाचांना भेगा पडू लागतात.

News18
News18
मुंबई : वातावरणात मोठे बदल झाले की त्वचेवर परिणाम दिसतात. त्यातलाच एक म्हणजे हिवाळा. हिवाळ्यात टाचांना भेगा पडणं ही एक सामान्य समस्या आहे. यासाठी केवळ हिवाळा जबाबदार नाही तर शरीरात जीवनसत्त्वं आणि खनिजांची कमतरता देखील जबाबदार असू शकते.
तुमच्या टाचांना वारंवार भेगा पडत असतील तर, यामागे आवश्यक पोषक घटकांची कमतरता हे कारणही असू शकतं. टाचांना भेगा पडण्याचं एक प्रमुख कारण व्हिटॅमिन ई आणि झिंकची कमतरता असू शकते. व्हिटॅमिन ई त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी आणि त्वचेचं आरोग्य राखण्यास मदत करते. या जीवनसत्वाची कमतरता असते तेव्हा त्वचा कोरडी होते आणि टाचांना भेगा पडू लागतात.
advertisement
त्वचेच्या उपचारांमधे झिंक महत्त्वाची भूमिका बजावते. या कमतरतेमुळे त्वचेचं नुकसान वेगानं होऊ शकते आणि त्वचेवर खोल भेगा पडतात.
टाचांना भेगा पडण्याची इतर प्रमुख कारणं -
पोषक घटकांच्या कमतरतेव्यतिरिक्त, टाचांना भेगा पडण्याची इतर अनेक कारणं आहेत.
advertisement
कोरडी हिवाळी हवा - थंड आणि कोरडी हवा असेल तर यामुळे त्वचेतून ओलावा काढून टाकला जातो, यामुळे टाचा कोरड्या आणि निर्जीव होतात.
लठ्ठपणा - वजन वाढलं की पायांवर जास्त दबाव येतो. जास्त वेळ उभं राहिल्यानं किंवा चालण्यामुळे त्वचेवर ताण येतो. हा ताण आल्यामुळे टाचांची त्वचा फाटू शकते.
त्वचेचे आजार - एक्झिमा, सोरायसिस किंवा बुरशीजन्य संसर्ग यासारख्या समस्यांमुळे त्वचा कमकुवत होते, ज्यामुळे टाचांना भेगा पडतात.
advertisement
चुकीचे बूट घालणं - याशिवाय, खूप पातळ तळवे असलेले बूट किंवा सँडल घातल्यानं टाचांवर जास्त ताण येतो आणि त्या वारंवार फुटतात.
टाचांची काळजी कशी घ्यावी?
टाचांसाठी अंतर्गत आणि बाह्य काळजी घेणं आवश्यक आहे. ओमेगा-३ फॅटी एसिड आणि व्हिटॅमिन ई समृद्ध असलेले पदार्थ, उदा - बदाम, अक्रोड, जवस आणि एवोकॅडो यांचा समावेश करा.
advertisement
दररोज रात्री काही मिनिटं कोमट पाण्यात पाय बुडवा, नंतर स्क्रब किंवा प्युमिस स्टोननं हळूवारपणे पाय एक्सफोलिएट करा. त्यानंतर, नारळ तेल किंवा मॉइश्चरायझर लावा, हळूवारपणे मालिश करा आणि झोपण्यापूर्वी मोजे घाला.
या छोट्या आणि उपयुक्त उपायांमुळे टाचा मऊ राहतीलच, शिवाय शरीरातील पोषक तत्वांचं संतुलनही राखलं जाईल आणि त्वचेच्या समस्या कमी होतील.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cracked Heels : तळव्यांना भेगा का पडतात ? टाचांसाठी कोणते उपाय करायचे ?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement