TRENDING:

Nutmeg Powder : चेहऱ्यासाठी असा करा जायफळाचा वापर, त्वचा दिसेल स्वच्छ, चमकदार

Last Updated:

चेहऱ्यावरचे डाग आणि वृद्धत्वाच्या खुणा कमी करण्यासाठी जायफळ प्रभावी मानलं जातं. जायफळातले अँटिऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचा उजळण्यासाठी उपयुक्त ठरतात. जायफळ - कच्चं दूध, जायफळ आणि मध, जायफळ आणि दह्याचा फेस पॅक चेहऱ्यासाठी चांगले पर्याय आहेत. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : स्वयंपाकघरात रोज वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमधे औषधी गुणधर्म असतात. त्यात तुलनेनं कमी वापरलं जातं जायफळ. हा स्वयंपाकघरात ठेवला जाणारा एक छोटासा मसाला. त्वचा स्वच्छ, चमकदार आणि तरुण दिसण्यासाठी जायफळ उपयुक्त ठरतं.
News18
News18
advertisement

चेहऱ्यावरचे डाग आणि वृद्धत्वाच्या खुणा कमी करण्यासाठी जायफळ प्रभावी मानलं जातं. जायफळातले अँटिऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचा उजळण्यासाठी उपयुक्त ठरतात. जायफळ - कच्चं दूध, जायफळ आणि मध, जायफळ आणि दह्याचा फेस पॅक चेहऱ्यासाठी चांगले पर्याय आहेत.

जायफळ आणि कच्चं दूध - जायफळ आणि कच्चं दूध नैसर्गिकरित्या त्वचेला उजळ आणि मऊ करतात. एक चमचा ताजं जायफळ किसून घ्या आणि त्यात अर्धा ते एक चमचा कच्चं दूध मिसळून पेस्ट तयार करा.

advertisement

Water Intake: पाणी कमी पिताय ? आताच सावध व्हा ! शरीरावर होतात गंभीर परिणाम

चेहऱ्यावर दहा - पंधरा मिनिटं लावा. नंतर हलक्या हातानं मालिश करा आणि थंड पाण्यानं स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरल्यानं डाग हळूहळू कमी होतील.

जायफळ आणि मध - जायफळ आणि मध एकत्रितपणे त्वचा मऊ आणि स्वच्छ करण्यास मदत करतात. एक चमचा जायफळ पेस्टमधे एक चमचा मध मिसळा आणि पंधरा मिनिटं चेहऱ्यावर लावा. नंतर कोमट पाण्यानं धुवा. यामुळे डाग कमी होतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. अर्धा चमचा जायफळ, काही थेंब लिंबू आणि चिमूटभर हळद मिसळून पेस्ट बनवा. ते डागांवर लावा आणि दहा-पंधरा मिनिटं तसंच राहू द्या, नंतर पाण्यानं धुवा. हा पॅक त्वचेला मॉइश्चरायझ करतो आणि डाग हलके करतो. त्वचा संवेदनशील असेल तर लिंबाचं प्रमाण मर्यादित करा किंवा टाळा.

advertisement

Winter Tips : थंडीत चणे - गूळ का खावं ? किती प्रमाणात खावं, वाचा खास विंटर टिप्स

जायफळ आणि दह्याचा फेस पॅक - एक चमचा जायफळ पावडर आणि एक चमचा दह्याची पेस्ट बनवा. ती तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. यामुळे डाग कमी होतात तसंच त्वचेचा रंगही उजळतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सेंद्रिय आणि रासायनिकमध्ये फरक काय? कशी करावी शेती? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

यातला कोणताही जायफळ पॅक वापरल्यानंतर चांगलं सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावा. आठवड्यातून फक्त दोन ते तीन वेळा वापरा. नेहमी ताजं किसलले जायफळ वापरा आणि लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Nutmeg Powder : चेहऱ्यासाठी असा करा जायफळाचा वापर, त्वचा दिसेल स्वच्छ, चमकदार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल