Winter Tips : गूळ - चणे - थंडीतला आवडता खाऊ, दिवसभर देईल ऊर्जा, पचन होईल चांगलं

Last Updated:

हिवाळ्यात आपल्या शरीराला जास्त ऊर्जा आणि उबदार पदार्थांची आवश्यकता असते. आरोग्य चांगलं राहावं यासाठी गूळ आणि चणे हे मिश्रण खूप फायदेशीर आहे.

News18
News18
मुंबई : हिवाळा आला म्हणजे विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असते आणि याच काळात रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवणंही आवश्यक आहे.
हिवाळ्यात आपल्या शरीराला जास्त ऊर्जा आणि उबदार पदार्थांची आवश्यकता असते. आरोग्य चांगलं राहावं यासाठी गूळ आणि चणे हे मिश्रण खूप फायदेशीर आहे.
गूळ आणि चणे दोन्ही आरोग्यासाठी चांगले मानले जातात. पाहूयात याचे आरोग्यदायी फायदे
शरीराला बळकटी -  गूळ आणि चणे खाल्ल्यानं त्वरित ऊर्जा मिळते. ही ऊर्जा बराच काळ टिकते. हिवाळ्यात थंडीत काही वेळा आळस आणि थकवा जाणवू शकतो, त्यामुळे आहारात असे पदार्थ जरुर खा.
advertisement
पचन - आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मते, गूळ पाचन एंजाइम सक्रिय करतो, तर चण्यामधे फायबर असतं, जे पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. म्हणूनच, तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर हे मिश्रण अत्यंत फायदेशीर ठरू शकतं.
हाडांची मजबुती - हिवाळ्यात अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो. गूळ आणि चणे खाणं त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. चण्यात फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असतं, तर गुळात कॅल्शियम असतं. हे सर्व घटक हाडं मजबूत करतात आणि सांधेदुखी किंवा संधिवातापासून आराम देतात.
advertisement
रोगप्रतिकारक शक्ती - गुळातील लोह नवीन रक्तपेशी तयार करण्यास मदत करते आणि रक्त स्वच्छ ठेवते.
दरम्यान, चण्यात प्रथिनं आणि खनिजं भरपूर प्रमाणात असतात, यामुळे शरीराला आतून मजबुती मिळते. यामुळे सर्दी, खोकला आणि विषाणूजन्य संसर्गापासून संरक्षण होण्यास मदत होते.
advertisement
त्वचा - गूळ आणि चणे खाल्ल्यानं अशक्तपणा कमी होण्यास मदत होते, (विशेषतः महिलांसाठी). यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते आणि हिवाळ्यात जाणवणारा त्वचेवरचा कोरडेपणा कमी होतो.
दिवसातून किती गूळ आणि चणे खावेत ?
डॉ. झैदी यांच्या मते, दररोज 25-30 ग्रॅम भाजलेले चणे आणि 15-20 ग्रॅम गूळ खाणं पुरेसं आहे. यापेक्षा जास्त खाल्ल्यान गॅस, पोटफुगी किंवा वजन वाढू शकतं. म्हणून, ते कमी प्रमाणात घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Tips : गूळ - चणे - थंडीतला आवडता खाऊ, दिवसभर देईल ऊर्जा, पचन होईल चांगलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement