Amla Powder : केस नैसर्गिकरित्या दिसतील काळे, आवळ्याचा असा करा उपयोग
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
नैसर्गिकरित्या केस काळे करण्याचा प्रयत्न करत असाल तर आवळा हा चांगला पर्याय आहे. आवळ्यात, नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि टॅनिनसारखे पोषक घटक असतात. यामुळे, केसांमधे मेलेनिनची पातळी वाढते आणि केस काळे होण्यास मदत होते.
मुंबई : पांढरे केस लपवण्यासाठी बऱ्याचदा केसांचे रंग वापरले जातात. केसांना सूट होतील अशा विविध छटा यात उपलब्ध असतात. पण यातली रसायनं केसांना आणखी नुकसान पोहोचवू शकतात.
नैसर्गिकरित्या केस काळे करण्याचा प्रयत्न करत असाल तर आवळा हा चांगला पर्याय आहे. आवळ्यात, नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि टॅनिनसारखे पोषक घटक असतात. यामुळे, केसांमधे मेलेनिनची पातळी वाढते आणि केस काळे होण्यास मदत होते. यामुळे केस जाड होतात आणि केसांवरचा रंगही चांगला दिसतो. आवळा मेंदी आणि केसांसाठी मिळणाऱ्या नीळ पावडरमधे मिसळून केसांना लावल्यानं केस काळे होतात.
advertisement
केसांचा रंग तयार करण्यासाठी लागणारं साहित्य -
आवळा पावडर - दोन टेबलस्पून
मेंदी पावडर - एक टेबलस्पून
केसांसाठी मिळणारी नील पावडर - एक टेबलस्पून
कॉफी किंवा ब्लॅक टी पावडर - एक टीस्पून
नारळ किंवा एरंडेल तेल - एक चमचा
advertisement
लिंबाचा रस - काही थेंब
कोमट पाणी - गरजेनुसार
केसांचा नैसर्गिक रंग कसा तयार करायचा - आवळा पावडर कोमट पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा आणि पंधरा मिनिटं तसंच राहू द्या. मेंदी, नीळ, कॉफी पावडर, लिंबाचा रस आणि थोडंसं खोबरेल तेल एकत्र करून एका गुळगुळीत मिश्रणात मिसळा. हे मिश्रण कमीत कमी तीस मिनिटं बाजूला ठेवा. नंतर टाळूला लावा आणि दोन तास तसंच राहू द्या. थोड्या वेळानं किंवा दुसऱ्या दिवशी शाम्पूनं केस धुवा. महिन्यातून दोनदा याचा वापर करु शकता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 13, 2025 7:58 PM IST


