तेल प्रत्येक वेळी हानिकारक नसतं, किती प्रमाणात तेल पोटात जातं हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक तेल हानिकारक नसतं. नारळ तेल, मोहरीचं तेल आणि ऑलिव्ह ऑइल सारखी काही नैसर्गिक तेलं शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. नारळाच्या तेलात मध्यम साखळीतील फॅटी अॅसिड असतात जे शरीराला ऊर्जा देतात आणि चयापचय गतिमान करतात.
Obesity : लठ्ठपणा देईल अनेक आजारांना आमंत्रण, या चार उपायांनी राहिल तब्येत व्यवस्थित
advertisement
मोहरीच्या तेलात ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी अॅसिड असतात. यामुळे हृदय निरोगी राहतं. ऑलिव्ह ऑइलमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात यामुळे शरीरातील सूज कमी होते. दररोज मर्यादित प्रमाणात या तेलांचं सेवन केल्यानं शरीराला आवश्यक चरबी मिळतात. यामुळे हार्मोनल संतुलन, त्वचेची चमक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं.
आयुर्वेदात मधाला अमृत म्हणतात. चव वाढवण्याबरोबरच यामुळे शरीराला आतून बळकटी मिळते. मधात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. दररोज सकाळी कोमट पाण्यात मध घेतल्यानं पचनक्रिया सुधारते आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते. हृदयाच्या आरोग्यासाठी देखील हा चांगला पर्याय आहे आणि ताण कमी करण्यात यामुळे मदत होते. मधामुळे, आयुर्मान वाढतं तसंच आयुष्याची गुणवत्ता देखील सुधारते.
तूप हे एक आयुर्वेदिक सुपरफूड आहे. भारतीय संस्कृतीत तूपाला खूप आदर दिला जातो. यामुळे अन्न स्वादिष्ट होतंच आणि शरीराचं पोषणही.
Cinnamon Water : दालचिनीचं पाणी करेल शरीराचं रक्षण, मधुमेह नियंत्रण, पचनासाठीही फायदेशीर
तुप शरीराला उबदारपणा मिळतो आणि यामुळे सांधे मजबूत होतात. यात शरीराच्या वाढीसाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असलेली जीवनसत्त्वे अ, ड, ई आणि के असतात. तूप मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, यामुळे स्मरणशक्ती सुधारते आणि ताण कमी होतो. दररोज एक चमचा तूप खाल्ल्यानं शरीरातील संतुलन राखलं जातं आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते.
दीर्घायुष्याचं रहस्य तुमच्या ताटात आहे हे कायम लक्षात ठेवा. दीर्घायुषी, निरोगी राहायचं असेल तर आहारात या तीन गोष्टींचा समावेश करा, चांगलं तेल, मध आणि देशी तूप. या पदार्थांमुळे शरीराच्या पोषणाबरोबरच मानसिक आणि भावनिक संतुलन देखील होतं.
