advertisement

Cinnamon Water : दालचिनीचं पाणी करेल शरीराचं रक्षण, मधुमेह नियंत्रण, पचनासाठीही फायदेशीर

Last Updated:

दालचिनीच्या पाण्यामुळे आरोग्य सुधारतंच तसंच अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण देखील होतं. रक्तातील साखरेचं नियंत्रण, पचनसंस्था मजबूत करण्यासाठी याचा उपयोग होतो. 

News18
News18
मुंबई : फास्ट फूड, ताणतणाव आणि कमी झोप यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. दिनचर्येत छोटासा बदल केला तर शरीराचं अनेक प्रकारच्या आजारांपासून रक्षण होतं. यासाठी डॉ. बिमल छाजेड यांनी दालचिनीचं पाणी हा उपाय सुचवला आहे.
दालचिनीच्या पाण्यामुळे आरोग्य सुधारतंच तसंच अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण देखील होतं. रक्तातील साखरेचं नियंत्रण, पचनसंस्था मजबूत करण्यासाठी याचा उपयोग होतो.
दालचिनीतले नैसर्गिक गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. रात्री झोपण्यापूर्वी दालचिनीचं पाणी प्यायलं तर ते सकाळपर्यंत रक्तातील साखर संतुलित ठेवण्यासाठी मदत होते. ज्यांना मधुमेह आहे किंवा ज्यांना मधुमेहाचा धोका आहे त्यांच्यासाठी हे विशेषतः फायदेशीर आहे.
advertisement
पचनसंस्था मजबूत करण्यासाठी उपयुक्त -
दालचिनीचं पाणी प्यायल्यानं पचनशक्ती वाढवण्यास देखील मदत होते. गॅस, अपचन आणि पोट फुगणं यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. रात्री झोपण्यापूर्वी हे पाणी प्यायल्यानं अन्नाचं योग्य पचन होण्यास मदत होते आणि पोट हलकं आणि आरामदायी वाटतं.
advertisement
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर -
दालचिनीचं पाणी हृदय निरोगी ठेवण्यास देखील मदत करतं. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते आणि रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे हृदयरोगांचा धोका कमी होतो आणि रक्तदाब संतुलित राहतो.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते -
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दालचिनीचं पाणी खूप उपयुक्त आहे. यामधले अँटीऑक्सिडंट्स शरीराची संसर्गाशी लढण्याची क्षमता वाढवतात. सर्दी, खोकला आणि फ्लू सारख्या सामान्य आजारांपासून देखील यामुळे रक्षण होतं.
advertisement
वजन कमी करण्यास उपयुक्त -
वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर दालचिनीचं पाणी फायदेशीर ठरू शकते. यामुळे चयापचयाचा वेग वाढतो आणि शरीरातील चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगवान होते. झोपण्यापूर्वी सेवन केलं तर शरीरातील कॅलरीज बर्न करण्यास मदत होते.
यासाठी एक ग्लास पाणी उकळवा, त्यात एक इंच दालचिनीचं साल घाला, पाच-सात मिनिटं उकळवा आणि नंतर गाळून घ्या. रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cinnamon Water : दालचिनीचं पाणी करेल शरीराचं रक्षण, मधुमेह नियंत्रण, पचनासाठीही फायदेशीर
Next Article
advertisement
Sanjay Raut On Cancer: "पाणी पिणंही कठीण झालं होतं..."; संजय राऊतांचा मृत्यूशी झुंज देणारा तो थरार, पहिल्यांदाच केला खुलासा!
"पाणी पिणंही कठीण झालं होतं..."; संजय राऊतांचा मृत्यूशी झुंज देणारा तो थरार, पहि
  • ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मागील वर्षी गंभीर आजाराने ग्रासले होते.

  • संजय राऊत यांनी आपल्या आजाराबाबत सविस्तर भाष्य केले आहे.

  • दिवाळीच्या काही दिवस आधीच आपल्याला कॅन्सर झाल्याचे राऊत यांनी सांगितले

View All
advertisement