भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या मते, ताडासन हे आसन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
Skin Care : त्वचेची काळजी घेण्यात या चुका करु नका, चेहरा दिसेल निस्तेज
ताडासन करण्यासाठी सरळ उभं रहा आणि पाय एकमेकांपासून दोन इंच अंतरावर ठेवा. हातांची बोटं एकमेकांत गुंतवा आणि मनगटं बाहेरच्या दिशेनं वाकवा. श्वास घेताना, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत डोक्याच्या वर उचला. नंतर, टाचा जमिनीच्या वर उचला आणि पायाच्या बोटांवर संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करा आणि दहा-पंधरा सेकंद या स्थितीत रहा.
advertisement
ताडासनामुळे पाठीचा कणा मजबूत होतो आणि स्नायूंना लवचिकता येते. आयुष मंत्रालयाच्या मते, ताडासनानं रक्ताभिसरण सुधारतं, ज्यामुळे पचनसंस्था मजबूत होते.
Healthy Habits : उत्तम आरोग्यासाठी आधी सवयी बदला, आरोग्यदायी सवयींनी प्रकृती राहिल ठणठणीत
यामुळे ताण कमी होण्यास आणि मानसिक एकाग्रता वाढवण्यास देखील मदत होते. नियमित सरावानं पाय, पाठ आणि खांद्याचे स्नायू बळकट होतात.
या योगासनामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारतं. पण हे करताना काही बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कमी रक्तदाब किंवा चक्कर येणाऱ्यांनी पायांवर संतुलन राखताना सावधगिरी बाळगली पाहिजे.
गर्भवती महिलांनी हे आसन योगा प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली करावं. जास्त वेळ या आसनात राहिल्यानं पायांवर दबाव येऊ शकतो, म्हणून शरीराच्या क्षमतेनुसार सराव करा.
