TRENDING:

Tomato Benefits : टोमॅटो खाल्ल्याने खरंच कॅन्सरचा धोका कमी होतो?

Last Updated:

Tomato Prevent From Cancer : दररोजच्या वापरातील टोमॅटो कॅन्सरचा धोका कमी करतो, असं म्हटलं जातं. खरंच असं आहे का?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : आपण खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटो वापरतो. डाळ, आमटी, भाजीत टोमॅटोचा वापर करतो. टोमॅटीचीही भाजी बनवली जाते, तसंच सलाडमध्येही टोमॅटो असतो. पण टोमॅटो खाल्ल्याने काय होतं, त्याचा फायदा काय, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? दररोजच्या वापरातील टोमॅटो कॅन्सरचा धोका कमी करतो, असं म्हटलं जातं. खरंच असं आहे का?
News18
News18
advertisement

खरंतर, टोमॅटो तुमच्या जेवणाची चव वाढवतातच, पण त्याला सुपरफूडचा दर्जाही मिळाला आहे. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन म्हणजे सीडीसीनुसार , जगातील सर्वात शक्तिशाली किंवा फायदेशीर टोमॅटो. सीडीसीने फायद्यांचं परीक्षण केल्यानंतर टोमॅटोला वरच्या यादीत ठेवलं आहे आणि आरोग्य फायद्यांमध्ये त्याला वीस गुण दिले आहेत. सीडीसी स्केलवर टोमॅटोला 20 गुण मिळाले आहेत, जे गाजरच्या अगदी खाली आणि लिंबूच्या अगदी वर आहे.  सीडीसीने फळे आणि भाज्यांमध्ये असलेल्या कॅलरीज आणि पोषक तत्वांच्या प्रमाणाच्या आधारे हे रँकिंग केलं आहे. टोमॅटोमध्ये खूप कमी कॅलरीज असतात आणि त्याचे पोषक मूल्य, विशेषतः लायकोपीन, सर्वात जास्त असतं.

advertisement

टोमॅटोमध्ये कोणकोणते घटक असतात?

हेल्थलाइनच्या मते , टोमॅटोमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. विशेषतः त्यात असलेले लायकोपीन जास्त प्रमाणात असते. लायकोपीनमुळे टोमॅटोचा रंग लाल असतो. त्यात कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स खूप कमी असतात. टोमॅटो हे व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फोलेट (व्हिटॅमिन बी9), व्हिटॅमिन के, फायबर, पाणी इत्यादींचा उत्कृष्ट स्रोत आहे. तसेच, त्यात बीटा कॅरोटीन, क्लोरोजेनिक अॅसिड, एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट कंपाऊंड सारखे वनस्पती संयुगे असतात.

advertisement

High BP ला करा बाय बाय! एका छोटाशा दाण्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवा

टोमॅटो खाण्याचे फायदे

टोमॅटोमधील घटक फ्री रेडिकल्समुळे होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह ताणापासून संरक्षण करतात. ऑक्सिडेटिव्ह ताणामुळे मधुमेह, कर्करोग, हृदयरोग आणि इतर अनेक जुनाट आजार होऊ शकतात.

advertisement

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

टोमॅटोचे सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो. एका अभ्यासानुसार, टोमॅटोमध्ये आढळणाऱ्या लाइकोपीनच्या उच्च पातळीमुळे हृदयरोगाचा धोका 14% कमी होतो. याशिवाय टोमॅटो सूप आणि सॉससारखे टोमॅटोचे पदार्थ रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतात. टोमॅटोचं सेवन केल्याने उच्च रक्तदाबाचा धोका 36% कमी होऊ शकतो. पोटॅशियम हृदयाचं आरोग्य सुधारतं. त्याचे सेवन हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकपासून बचाव करते. लायकोपीन वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतं.

advertisement

बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो

आहारात फायबरची कमतरता अनेकदा बद्धकोष्ठतेस कारणीभूत ठरते. टोमॅटोमध्ये फायबर असल्याने ते पचनशक्ती वाढवते, ज्यामुळे बद्धकोष्ठता टाळता येते. टोमॅटोमध्ये विरघळणारे आणि अघुलनशील फायबर असते, जे पचनसंस्था सुधारते. त्यात असलेले सेल्युलोज आणि पेक्टिन फायबर आतड्यांमध्ये निरोगी मल तयार करण्यास मदत करते.

मधुमेहाचा धोका कमी करते

टोमॅटोमध्ये आढळणारे लायकोपीन पेशींना नुकसान होण्यापासून वाचवण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. काही अभ्यासातून असं दिसून आलं आहे की टोमॅटोचं नियमित सेवन केल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो.

मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त 

टोमॅटोमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स अल्झायमरसारख्या आजारांना रोखण्यास मदत करू शकतात. एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की लाइकोपीनचे जास्त सेवन 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये संज्ञानात्मक घट कमी करू शकते. तथापि, यावर अधिक संशोधन आवश्यक आहे.

कर्करोगाचा धोका कमी करते

टोमॅटोमध्ये असलेले लायकोपीन आणि बीटा-कॅरोटीन हे अँटीऑक्सिडंट्स आहेत, जे पेशींना नुकसान होण्यापासून वाचवण्यास मदत करतात. पिकलेले टोमॅटो विशेषतः प्रभावी आहेत, कारण ते कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यास मदत करतात. अनेक संशोधनामध्ये दिसून आलं आहे की लायकोपीन प्रोस्टेट कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि इतर प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी करतो.

Health Risk Of The Day : दररोज सकाळी चहासोबत चपाती खाल्ल्याने काय होतं?

अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, लाइकोपीनचं सेवन प्रोस्टे कॅन्सरचा धोका कमी करू शकतो. जर्नल ऑफ नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटमध्ये प्रकाशित संशोधनानुसार लाइकोपीनचं सेवनं प्रोस्टेस कॅन्सरचा धोका 21 टक्के कमी करू शकतो. जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार टोमॅटो खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो.

आहारात टोमॅटोचा करा समावेश

म्हणून जर तुम्ही आतापर्यंत टोमॅटोकडे दुर्लक्ष करत असाल तर ते दररोज तुमच्या प्लेटचा भाग बनवा आणि त्याचे उत्तम फायदे घ्या. जर तुम्हाला दीर्घकाळ आजारांपासून दूर राहायचं असेल आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल, तर सॅलडमध्ये टोमॅटोचा समावेश करायला विसरू नका.  दररोज तुमच्या सॅलडमध्ये टोमॅटोचा समावेश केल्याने तुमच्या हृदयाला, मेंदूला आणि पचनसंस्थेला अनेक फायदे मिळू शकतात. तुमचे आरोग्य सुधारण्याचा हा एक सोपा आणि चविष्ट मार्ग आहे. ते तुमच्या आहाराचा भाग बनवा आणि त्याच्या पौष्टिक गुणधर्मांचा फायदा घ्या.

(सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18मराठीने याची पडताळणी केलेली नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही. कोणत्याही नुकसानीसाठी न्यूज18मराठी जबाबदार नाही. अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tomato Benefits : टोमॅटो खाल्ल्याने खरंच कॅन्सरचा धोका कमी होतो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल