TRENDING:

Cancer : कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं समजून घ्या, त्वरीत उपचार करणं होईल शक्य

Last Updated:

कर्करोगामुळे सुरुवातीला शरीरात सूक्ष्म बदल होतात. ज्याकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात. पण असं करणं घातक ठरू शकतं. कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : कर्करोग या गंभीर आजाराचं प्रमाण वाढत चाललंय. पण, सुरुवातीच्या टप्प्यातली लक्षणं ओळखली तर  त्वरीत उपचार करण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते. कर्करोगामुळे शरीरात काही बदल  सुरू होतात, जे वेळेवर ओळखले तर संसर्ग वाढण्यापूर्वीच उपचार सुरू करता येतात.
News18
News18
advertisement

कर्करोगामुळे सुरुवातीला शरीरात सूक्ष्म बदल होतात. ज्याकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात. पण असं करणं घातक ठरू शकतं. कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घेऊया.

वारंवार येणारा ताप किंवा संसर्ग - ताप हा सहसा शरीर संसर्गाशी लढत असल्याचं लक्षण असतं, पण कोणतंही स्पष्ट कारण नसताना वारंवार येणारा ताप चिंतेचं कारण असू शकतो. काही प्रकारचे कर्करोग, विशेषतः रक्ताचा कर्करोग, शरीराच्या रोगांशी लढण्याच्या क्षमतेवर परिणाम करतात, ज्यामुळे वारंवार ताप आणि संसर्ग होऊ शकतो.

advertisement

Immunity : हिवाळ्यात अशी घ्या काळजी, घरी बनवून ठेवा हा रस, जाणून घ्या फायदे

वजन कमी होणं - आहार किंवा व्यायामात कोणताही बदल न करता वेगानं वजन कमी होत असेल, तर याकडे दुर्लक्ष करु नका. अचानक पाच किलोग्रॅम किंवा त्याहून अधिक वजन कमी होणं हे कर्करोगाचे प्रारंभिक लक्षण असू शकतं. हे लक्षण बहुतेकदा स्वादुपिंडाचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग किंवा अन्ननलिकेचा कर्करोग यामधे दिसून येतं.

advertisement

सतत थकवा आणि अशक्तपणा - सामान्य थकवा विश्रांतीनं निघून जातो, पण तुम्हाला जर बराच वेळ खूपच थकवा जाणवत असेल आणि विश्रांतीनंतरही हा थकवा जात नसेल तर ती चिंतेची बाब आहे. कर्करोगाच्या पेशी शरीरातील पोषक तत्वांचा वापर वाढण्यासाठी करतात, ज्यामुळे उर्जेचा अभाव होऊ शकतो. हे लक्षण विशेषतः ल्युकेमिया आणि कोलन कॅन्सरमधे आढळतं.

advertisement

Vitamin D : 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरता ठरु शकते हानिकारक, लक्षणं ओळखा, उपचार घ्या

त्वचेतील बदल - शरीरातील बदल त्वचेवर दिसतात. त्वचेचा पिवळापणा, तीळांच्या आकारात, रंगात किंवा आकारात अचानक बदल, नवीन तीळ किंवा डाग दिसणं किंवा न बरं होणाऱ्या जखमा ही सर्व त्वचेच्या कर्करोगाची किंवा इतर कर्करोगाची लक्षणं असू शकतात. त्वचेचा पिवळा रंग यकृत किंवा स्वादुपिंडाच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात गुडघेदुखीचा त्रास? आहारात समावेश करा मेथीचे लाडू, अनेक होतील फायदे
सर्व पहा

शरीराच्या एखाद्या भागात सतत वेदना होणं - शरीराच्या एखाद्या भागात सतत वेदना होणं जे सामान्य उपचारांना प्रतिसाद देत नाही ते कर्करोगाचं लक्षण असू शकतं. सतत डोकेदुखी हे ब्रेन ट्यूमरचे लक्षण असू शकतं, पाठदुखी हे कोलोरेक्टल किंवा गर्भाशयाच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं आणि सतत छातीत दुखणं हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचं लक्षण असू शकते. हाडांमधे वेदना हे हाडांचा कर्करोग किंवा हाडांमधे पसरलेल्या इतर कर्करोगाचं लक्षण असू शकतं.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cancer : कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं समजून घ्या, त्वरीत उपचार करणं होईल शक्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल