Vitamin D : 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेकडे दुर्लक्ष नको, ही लक्षणं असतात शरीरानं दिलेले संकेत

Last Updated:

व्हिटॅमिन डीची कमतरता ही एक गंभीर समस्या आहे. याकडे त्वरित लक्ष दिलं नाही तर गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकते. कमतरतेची लक्षणं दिसतात, तेव्हा त्याकडे लक्ष देणं अधिक गरजेचं आहे. विशेषत: महिलांमधे ही लक्षणं अधिक दिसतात.

News18
News18
मुंबई : सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. पण, भारतासारख्या देशात, जिथे खूप सूर्यप्रकाश असतो, तरीही व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवते. ही कमतरता महिलांमध्ये अधिक असते.
व्हिटॅमिन डीची कमतरता ही एक गंभीर समस्या आहे. याकडे त्वरित लक्ष दिलं नाही तर गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकते. कमतरतेची लक्षणं दिसतात, तेव्हा त्याकडे लक्ष देणं अधिक गरजेचं आहे. विशेषत: महिलांमधे ही लक्षणं अधिक दिसतात.
advertisement
महिलांमधे व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेची लक्षणं -
  • पुरेशी झोप घेतल्यानंतरही नेहमीच थकवा आणि सुस्ती वाटत असेल, तर हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचं एक प्रमुख लक्षण असू शकतं. हा थकवा इतका तीव्र असू शकतो की त्यामुळे दैनंदिन कामं करणं देखील कठीण होऊ शकतं.
  • हाडं आणि स्नायू दुखणं - व्हिटॅमिन डी कॅल्शियम शोषण्यास मदत करते. कमतरतेमुळे हाडं कमकुवत आणि मऊ होऊ शकतात, ज्यामुळे सामान्य किंवा तीव्र स्वरुपात हाडं आणि स्नायू दुखी जाणवू शकते.
  • वारंवार होणारे संसर्ग - व्हिटॅमिन डी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. या कमतरतेमुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमकुवत होते, ज्यामुळे महिलांमधे वारंवार सर्दी, फ्लू आणि इतर संसर्ग होतात.
  • मूड स्विंग्स आणि नैराश्य - कुठल्याही ठोस कारणाशिवाय दुःखी, चिडचिडं किंवा तणावग्रस्त वाटत असेल तर सावध व्हा. कारण, व्हिटॅमिन डीची कमतरता मेंदूच्या कार्याशी, विशेषतः मूड नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सशी थेट जोडलेली आहे. म्हणून, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे नैराश्याची भावना देखील उद्भवू शकते.
advertisement
  • केस गळणं - केस गळती अनेक कारणांमुळे होऊ शकते, पण ताण आणि पौष्टिक कमतरतेव्यतिरिक्त, व्हिटॅमिन डीची कमतरता देखील एक प्रमुख कारण आहे. केसांसाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. या कमतरतेमुळे केसांची वाढ खुंटू शकते आणि केस जास्त गळू शकतात.
  • जखमा बऱ्या होण्यास उशीर होतो - कापलं असेल किंवा जखम बरी होण्यास नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत असेल, तर ते व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. नवीन त्वचेच्या पेशींच्या निर्मितीमधे आणि बरे होण्याच्या प्रक्रियेत व्हिटॅमिन डी महत्त्वाची भूमिका आहे.
  • हाडं कमकुवत होणं - दीर्घकाळ व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडांची घनता कमी होऊ शकते, ज्यामुळे कमकुवतपणा येतो. या स्थितीला ऑस्टियोपोरोसिस म्हणतात. यामुळे किरकोळ दुखापतींसह, विशेषतः पाठीचा कणा, कंबर आणि मनगटात फ्रॅक्चर होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.
  • स्नायूत पेटके येणं - स्नायूंमधे ताण किंवा पेटके येणं हे देखील व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Vitamin D : 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेकडे दुर्लक्ष नको, ही लक्षणं असतात शरीरानं दिलेले संकेत
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement