advertisement

Skin Care : तांदळाच्या पिठाचा फेसपॅक वापरा, नैसर्गिक उपायांनी चेहरा दिसेल तजेलदार

Last Updated:

बाजारात उपलब्ध असलेल्या रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा नैसर्गिक उत्पादनांचा वापर करणं चांगलं. त्वचा सुंदर राखण्यासाठी तांदळाचं पीठ खूप फायदेशीर आहे. तांदळाच्या पीठाबरोबर, मैदा, दूध आणि थोडा मध तसंच दही वापरुनही फेस पॅक बनवता येतात. 

News18
News18
मुंबई : फेशियलचे अनेक प्रकार असतात. फ्रूट, क्लासिक, गोल्ड असे अनेक प्रकार तुम्ही वापरलेही असतील. त्यासोबतच एका नैसर्गिक फेशियलचा वापर केला नसेल तर नक्की करुन पाहा. त्वचेच्या सौंदर्यासाठी तांदळाचं पीठ मोठ्या प्रमाणात वापरलं जातं.
बाजारात उपलब्ध असलेल्या रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा नैसर्गिक उत्पादनांचा वापर करणं चांगलं. त्वचा सुंदर राखण्यासाठी तांदळाचं पीठ खूप फायदेशीर आहे. तांदळाच्या पीठाबरोबर, मैदा, दूध आणि थोडा मध तसंच दही वापरुनही फेस पॅक बनवता येतात.
तांदळाच्या पीठातील पोषक घटक - तांदळाच्या पीठात व्हिटॅमिन बी, पेरुलिक एसिड, अलँटोइन आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे पोषक घटक असतात. हे पेशी दुरुस्त करण्यास मदत करतात. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक देखील येते. तांदळाच्या पिठापासून बनवलेले फेस पॅक आणि स्क्रब वापरल्यानं त्वचा मऊ होते आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत होते.
advertisement
तांदळाच्या पिठाचा फेस पॅक - तांदळाच्या पिठाचा फेस पॅक बनवण्यासाठी, दोन चमचे मैदा, एक चमचा दूध आणि थोडा मध मिसळून एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. हे मिश्रण चेहऱ्याला लावा. पंधरा मिनिटांनी कोमट पाण्यानं धुवा. आठवड्यातून ही पेस्ट दोनदा लावा, जेणेकरून त्वचा नैसर्गिकरित्या उजळ होईल.
advertisement
तांदळाचं पीठ आणि दही वापरा - तांदळाचं पीठ आणि दही वापरणंही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. या
दोन्ही घटकांमधे त्वचेला उजळवणारे घटक भरपूर प्रमाणात असतात. तांदळाचं पीठ आणि दह्यात लॅक्टिक एसिड असतं, जे त्वचेला एक्सफोलिएट करतं.
तांदळाचं पीठ आणि मधाचे फायदे - त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी, तांदळाचं पीठ मधात मिसळा आणि ते तुमच्या चेहऱ्याला लावा. एका भांड्यात दोन चमचे तांदळाचे पीठ, एक चमचा मध आणि एक चमचा गुलाबजल एकत्र करा आणि चांगले मिसळा. ही पेस्ट तुमच्या पंधरा मिनिटं चेहऱ्यावर लावा. नंतर, तुमचा चेहरा पाण्यानं धुवा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : तांदळाच्या पिठाचा फेसपॅक वापरा, नैसर्गिक उपायांनी चेहरा दिसेल तजेलदार
Next Article
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
View All
advertisement