Winter Care : हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स, वाचा शहनाज हुसेन यांचा सल्ला

Last Updated:

अनेकदा हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसते. थंड हवा आणि कमी तापमानामुळे त्वचेतील ओलावा कमी होतो, ज्यामुळे ती आणखी संवेदनशील बनते. तुमचीही त्वचा हिवाळ्यात कोरडी वाटत असेल, तर प्रसिद्ध सौंदर्य तज्ञ शहनाज हुसेन यांनी दिलेल्या काही सोप्या टिप्सचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो.

News18
News18
मुंबई : यावर्षी लांबलेला पाऊस, मधेच येणारं ऊन आणि काही दिवसांनी येणारी थंडी. बदलत्या हवामानात आरोग्यासोबतच त्वचेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
अनेकदा हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसते. थंड हवा आणि कमी तापमानामुळे त्वचेतील ओलावा कमी होतो, ज्यामुळे ती आणखी संवेदनशील बनते. तुमचीही त्वचा हिवाळ्यात कोरडी वाटत असेल, तर प्रसिद्ध सौंदर्य तज्ञ शहनाज हुसेन यांनी दिलेल्या काही सोप्या टिप्सचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो.
हिवाळ्यातही तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी हे उपाय फायदेशीर ठरू शकतात. शहनाज हुसेन यांच्या मते, हिवाळ्याच्या काळात त्वचा खराब होऊ शकते. पण जर वेळेवर त्वचेची काळजी घेतली तर हिवाळ्यातही त्वचा निरोगी ठेवणं आणि त्वचेवरची चमक कायम राखणं शक्य आहे.
advertisement
तज्ज्ञांच्या मते, अति थंडी आणि वाऱ्यामुळे त्वचेतील सर्व ओलावा काढून टाकला जाऊ शकतो, ज्यामुळे मुरुमं होतात. म्हणूनच, हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स खूप उपयुक्त ठरू शकतात.
मॉइश्चरायझर - हिवाळ्यात त्वचेत ओलावा नसल्यानं त्वचा कोरडी होते. त्यामुळे त्वचेला मॉइश्चरायझिंग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शहनाज हुसेन यांच्या मते, हिवाळ्यात त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी, मधात दुधाची साय मिसळून किंवा कोरफडीचा गर मिसळून लावा. यामुळे त्वचेत ओलावा टिकवून ठेवता येतो. याव्यतिरिक्त, कोरड्या त्वचेसाठी, बदाम तेलानं दोन मिनिटं मालिश करा.
advertisement
त्वचेसाठी व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ खा - हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी, व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ खाणं योग्य राहिल. कारण व्हिटॅमिन सी मुळे शरीरात कोलेजन उत्पादन वाढवण्यास मदत होते.
तसंच यामुळे त्वचा मऊ, लवचिक ठेवण्यास मदत होते.
त्वचेवरची चमक कायम राहावी यासाठी काकडी आणि ग्लिसरीन लोशन बनवा. काकडीचा रस आणि ग्लिसरीन मिसळून त्वचेला लावल्यानं त्वचेला मॉइश्चरायझ करता येईल आणि ती मऊ आणि चमकदार ठेवण्यास मदत होईल.
advertisement
बटाटा आणि मधाचा फेस मास्क - बटाटे कुस्करून त्यात थोडा मध घालून घरी फेस मास्क बनवता येतो. यामुळे त्वचेला पोषण मिळेल आणि त्वचा चमकदार राहील.
त्वचेसाठी कोणतंही उत्पादन वापरण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Care : हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स, वाचा शहनाज हुसेन यांचा सल्ला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement