Heart Disease : खाण्याबद्दल काळजी घ्याच पण अनुवांशिक घटकांकडेही लक्ष द्या, हृदयविकाराचं असू शकतात कारण
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
तुमच्या घरात, पालकांना किंवा भावंडांना कधी हृदयरोग किंवा हृदयविकाराचा झटका आला असेल, तर तुम्ही बाहेरून कितीही निरोगी दिसत असलात तरीही तुम्हाला धोका वाढू शकतो. काही लोकांमधे असलेल्या जनुकीय गुणधर्मांमुळे शरीरात कोलेस्टेरॉलचं योग्य नियमन रोखलं जातं. यामुळे रक्तदाबात असंतुलन निर्माण होऊ शकतं किंवा शरीरात सूज वाढू शकते. हे घटक एकत्रितपणे, हृदयविकाराचा झटका किंवा हृदयरोगाचा धोका वाढवू शकतात.
मुंबई : हृदयविकाराचा झटका येणं, हृदयविकारानं मृत्यू होण्याचं प्रमाण वाढतंय. यामागे, खाण्याच्या चुकीच्या सवयी, धूम्रपान किंवा ताणतणाव अशी कारणं असल्याचं म्हटलं जातं. पण यामागे, हृदयरोगाचा धोका अनुवांशिक घटकांशी देखील जोडलेला असतो.
तुमच्या घरात, पालकांना किंवा भावंडांना कधी हृदयरोग किंवा हृदयविकाराचा झटका आला असेल, तर तुम्ही बाहेरून कितीही निरोगी दिसत असलात तरीही तुम्हाला धोका वाढू शकतो. काही लोकांमधे असलेल्या जनुकीय गुणधर्मांमुळे शरीरात कोलेस्टेरॉलचं योग्य नियमन रोखलं जातं. यामुळे रक्तदाबात असंतुलन निर्माण होऊ शकतं किंवा शरीरात सूज वाढू शकते. हे घटक एकत्रितपणे, हृदयविकाराचा झटका किंवा हृदयरोगाचा धोका वाढवू शकतात. इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सच्या कार्डिओथोरॅसिक आणि कार्डिओव्हस्कुलर सर्जरीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. मुकेश गोयल यांनी ही माहिती दिली.
advertisement
आपण आपले अनुवांशिक गुणधर्म बदलू शकत नाही, पण या विकारांशी संबंधित धोका कमी करू शकतो. यासाठी वेळेवर चाचणी करून घेणं शक्य आहे.
कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास जाणून घ्या (family history): कुटुंबातील एखाद्याला हृदयरोग झाला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. याबद्दल तुमच्या डॉक्टरांना नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या चाचण्या आणि जीवनशैली त्यानुसार आखू शकतील.
advertisement
नियमित आरोग्य तपासणी : कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि रक्तातील साखरेची नियमित तपासणी करणं आवश्यक आहे. कोणत्याही समस्या लवकर ओळखल्या तर गंभीर आरोग्य धोके टाळता येतात.
जीवनशैलीतले बदल - भाज्या, फळं आणि फायबरयुक्त संतुलित आहार घ्या. तळलेले पदार्थ, जास्त मीठ आणि साखर खाणं टाळा. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. दररोज किमान ३० मिनिटे चालणे किंवा काही शारीरिक हालचाली करा.
advertisement
ताणतणाव व्यवस्थापन - दीर्घ काळ ताणतणावामुळे हृदयावरही दबाव येतो. ध्यान, योग किंवा तुमच्या आवडत्या गोष्टींत, छंदात मन रमवा, जेणेकरुन मनाची शांती मिळवणं शक्य होईल.
तरुण असल्यानं हृदयविकाराचा धोका नाही असं वाटत असेल तर हा भ्रम डोक्यातून काढून टाका. कारण, वास्तव असं आहे की, आजकाल लहान वयातही हृदयविकाराचं प्रमाण वेगानं वाढत आहे. विशेषतः ज्यांच्या कुटुंबात हृदयविकार आहे, त्यांनी अधिक सतर्क होणं गरजेचं आहे. म्हणूनच, तुमची अनुवांशिक पूर्वस्थिती समजून घेणं आणि त्यानुसार जीवनशैलीत बदल करणं शहाणपणाचं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 04, 2025 6:00 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heart Disease : खाण्याबद्दल काळजी घ्याच पण अनुवांशिक घटकांकडेही लक्ष द्या, हृदयविकाराचं असू शकतात कारण


