Skin Care : त्वचेसाठी वापरा हा आयुर्वेदिक उपाय, आयुर्वेदात आहे त्वचेची निगा राखण्याचं गुपित

Last Updated:

आयुर्वेदिक उपायांमुळे त्वचेला कोणत्याही दुष्परिणामांशिवाय पोषण मिळतं आणि त्वचेवर चमक येते. आयुर्वेदात कडुनिंब, हळद, मंजिष्ठ, कोरफड, गुलाब, चंदन, तुळस आणि त्रिफळा यासारख्या अनेक औषधी वनस्पतींचे उपयोग सांगितले आहेत. या सर्व घटकांमुळे त्वचेला आतून पोषण मिळतं, ज्यामुळे त्वचेवर चमक येते.

News18
News18
मुंबई : सध्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर सर्रास होतो. काहींना याचा वापर सहज करता येतो, काहींना महाग उत्पादनं वापरली तरी अपेक्षित परिणाम मिळत नाही. तुम्हीही यावर उत्तर शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे.
आयुर्वेदात सांगितलेले अनेक घटक त्वचेचं सौंदर्य नैसर्गिकरित्या मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. त्वचेची काळजी घेण्यासाठी केवळ बाह्य उत्पादनं नाही तर शरीराचं आतून पोषण होणं गरजेचं आहे.
आयुर्वेदिक उपायांमुळे त्वचेला कोणत्याही दुष्परिणामांशिवाय पोषण मिळतं आणि त्वचेवर चमक येते. आयुर्वेदात कडुनिंब, हळद, मंजिष्ठ, कोरफड, गुलाब, चंदन, तुळस आणि त्रिफळा यासारख्या अनेक औषधी वनस्पतींचे उपयोग सांगितले आहेत. या सर्व घटकांमुळे त्वचेला आतून पोषण मिळतं, ज्यामुळे त्वचेवर चमक येते.
advertisement
कडुनिंब - कडुनिंबामुळे रक्त शुद्ध होतं. यामुळे मुरुम, फोड किंवा ऍलर्जी कमी होण्यास मदत होते. हळदीमुळे सूज कमी होते आणि त्वचेवर चमक येते.
मंजिष्ठा - मंजिष्ठामुळे त्वचेवरचे डाग स्वच्छ होतात. कोरफडीमुळे त्वचा शांत होते आणि मॉइश्चरायझ होते. गुलाबपाण्यामुळे त्वचेला टोन येतो आणि चेहऱ्यावरची छिद्रं स्वच्छ होतात. चंदन आणि तुळसामुळे त्वचा शांत होते.
advertisement
त्रिफळा - त्रिफळामुळे पोट स्वच्छ राहतं आणि त्वचेचा पोत सुधारतो. हरिद्रा खंडामुले अलर्जी, खाज येणं किंवा पुरळ उठण्याचं प्रमाण कमी होतं. नारळ तेल आणि लवंग, कापूर यांच्या मिश्रणामुळे त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी आणि संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी मदत होते.
घरगुती स्क्रब - बेसन, हळद, चंदन पावडर, गुलाबपाणी, कडुनिंब पावडर आणि दही यांचं मिश्रण त्वचेसाठी उत्तम आहे. हा घरगुती स्क्रब त्वचेची काळजी घेण्यासाठी खूप परिणामकारक आहे. आठवड्यातून दोनदा हे मिश्रण लावल्यानं त्वचा मऊ, चमकदार आणि निरोगी राहते.
advertisement
योग्य आहार - या सर्व उपायांबरोबरच निरोगी आहार आणि नियमित दिनचर्या राखणं अत्यंत महत्वाचं आहे. तळलेले पदार्थ खाणं टाळा. या पदार्थांमुळे त्वचेचं नुकसान होतंच तसंच आरोग्यासाठी देखील हानिकारक आहे. त्याऐवजी, हिरव्या भाज्या, हंगामी फळं आणि कमी तेल आणि मसाले असलेले पदार्थ खाण्याकडे लक्ष द्या. तसंच, दररोज थोडा व्यायाम करा आणि किमान आठ तास चांगली झोप घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : त्वचेसाठी वापरा हा आयुर्वेदिक उपाय, आयुर्वेदात आहे त्वचेची निगा राखण्याचं गुपित
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement