Digestion: पोटाच्या समस्यांवर जुना आणि प्रचलित उपाय, घरगुती उपायानं होईल पोटदुखी कमी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
पोटात गॅस होणं ही पचनक्रियेच्या सर्वात सामान्य समस्यांपैकी एक आहे. जेवणानंतर काहींना ही समस्या जाणवते. त्रास कमी होण्यासाठी औषध करतात, पण त्याचा म्हणावा तसा परिणाम जाणवत नाही. यासाठी सैंधव मीठ, तूप, हिंगाचं मिश्रण हा त्यावर पारंपरिक उपाय आहे.
मुंबई : पोटाच्या समस्यांना तुम्हीही त्रासला असाल तर ही माहिती नक्की वाचा. कारण वेगवेगळी औषधं घेऊन परिणाम जाणवत नसेल तर एक पारंपरिक उपाय फायदेशीर ठरेल.
पोटात गॅस होणं ही पचनक्रियेच्या सर्वात सामान्य समस्यांपैकी एक आहे. जेवणानंतर काहींना हा त्रास जाणवतो. यासाठी सैंधव मीठ, तूप, हिंगाचं मिश्रण हा त्यावर पारंपरिक उपाय आहे. हे मिश्रण कसं बनवायचं आणि त्याचे फायदे याबद्दलची माहिती पाहूया.
या घरगुती उपचाराविषयी आयुर्वेदिक डॉक्टर रॉबिन शर्मा यांनी याबद्दल इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
advertisement
खाल्ल्यानंतर गॅस कमी करण्यासाठी हा उपाय परिणामकारक ठरु शकतो. यासाठी अर्धा चमचा गाईचं तूप, दोन चिमूट सैंधव मीठ, दोन चिमूट हिंग असं साहित्य गरजेचं आहे. हे तिन्ही घटक एकत्र मिसळा. हे मिश्रण जेवणापूर्वी खा असा सल्ला त्यांनी दिला आहे.
advertisement
पोटासाठी हिंगचे फायदे - हिंग पोटासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानलं जातं. यामुळे पाचक घटकांचं उत्पादन वाढतं, ज्यामुळे अन्न पचणं सोपं होतं. या मिश्रणामुळे आतड्यांचं काम देखील योग्यरित्या होतं. याव्यतिरिक्त, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता आणि पोटदुखी यासारख्या पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी हिंग फायदेशीर मानलं जातं.
advertisement
सैंधव मीठाचे फायदे - पचनसंस्था मजबूत करण्यासाठी सैंधव मीठ अत्यंत फायदेशीर मानलं जातं. या मिश्रणामुळे, आतड्यांमधील विषारी पदार्थ बाहेर पडतात. यामुळे भूक वाढते तसंच पोटफुगी आणि अपचन यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2025 7:44 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Digestion: पोटाच्या समस्यांवर जुना आणि प्रचलित उपाय, घरगुती उपायानं होईल पोटदुखी कमी


