Zakir Khan: आधी स्टँडअप कॉमेडितून ब्रेक, आता थेट रुग्णालयात ॲडमिट! झाकीर खानला नक्की झालंय तरी काय? भावाने दिली हेल्थ अपडेट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Zakir Khan Admitted in the Hospital: काही दिवसांपूर्वीच त्याने स्टँडअपमधून ब्रेक घेण्याची घोषणा केली आणि चाहत्यांना धक्का बसला होता. पण अशातच आता थेट रुग्णालयातील त्याचा व्हिडीओ समोर आल्याने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला आहे.
मुंबई : संपूर्ण देशाचा लाडका कॉमेडियन आणि 'सख्त लौंडा' अशी ओळख असलेला झाकीर खान सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला असून यामुळे चाहत्यांची धकधक वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने स्टँडअपमधून ब्रेक घेण्याची घोषणा केली आणि चाहत्यांना धक्का बसला होता. पण अशातच आता थेट रुग्णालयातील त्याचा व्हिडीओ समोर आल्याने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला आहे. नुकतंच झाकीरच्या भावाने एक ब्लॉग शेअर केला होता त्यामध्ये तो रुग्णालयातील कपडे परिधान केल्याचे दिसत आहे.
हॉस्पिटलमध्येही क्रिकेटचा फिव्हर
झाकीर सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात झाकीर उपचार घेत आहे. पण असे असतानाही, त्याचा नेहमीचाच बिनधास्त अंदाज दिसून आला. झाकीरचा भाऊ अरबाज खानने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये झाकीर लीलावती रुग्णालयातील बेडवर आराम करत असल्याचे दिसून आले. पण विशेष म्हणजे, आजारी असतानाही झाकीर टी२० च्या भारत विरुद्ध न्यूझीलंड फायनल सामन्याचा आनंद घेताना दिसला. हॉस्पिटलमधील एका प्रशस्त खोलीमध्ये तो आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह मॅच पाहण्यात मग्न होता. भावाने त्याला तब्येतीबद्दल विचारणा करताच झाकीर हसून म्हणाला, "तब्येतीचं सोड, सध्या मॅच फसली आहे!" या वाक्यावरून त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं की परिस्थिती कोणतीही असो, तो आपला कूल अंदाज सोडत नाही.
advertisement
झाकीरच्या तब्येतीची काळजी त्याच्या फॅन्सबरोबरच अनेक दिग्गज लोकांनाही आहे. आयपीएस मनोज कुमार शर्मा आणि त्यांच्या पत्नी आयआरएस श्रद्धा जोशी यांनीही रुग्णालयात जाऊन झाकीरची भेट घेतली. पण झाकीरला नेमकं झालंय काय, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
advertisement
advertisement
2030 पर्यंत झाकीर खानने घेतला आहे ब्रेक
गेल्या महिन्यात हैदराबादमधील आपल्या 'पापा यार' टूरदरम्यान झाकीरने एक धक्कादायक घोषणा केली होती. त्याने सांगितलं होतं की, २०२६ ते २०२८ किंवा कदाचित २०३० पर्यंत तो लाईव्ह कॉमेडी शो करणार नाही. एका दुर्मिळ अनुवंशिक आजारामुळे त्याने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात होतं. त्यावेळी त्याने आपली तब्येत ठणठणीत असल्याचा दावा केला होता, पण आता अचानक तो रुग्णालयात दाखल झाल्याने अफवांना पुन्हा उधाण आलं आहे.
advertisement
झाकीरला नक्की आजार काय?
झाकीर खानने स्वतः स्पष्ट केलं होतं की, त्याला कोणताही गंभीर किंवा जीवघेणा आजार झालेला नाही. मात्र, शरीर आणि मनाला विश्रांती देण्यासाठी आणि आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. सततच्या ट्रॅव्हलिंगमुळे आणि कामाच्या व्यापामुळे प्रकृतीवर परिणाम होऊ नये, हा त्याचा त्यामागचा हेतू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 15, 2026 5:16 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Zakir Khan: आधी स्टँडअप कॉमेडितून ब्रेक, आता थेट रुग्णालयात ॲडमिट! झाकीर खानला नक्की झालंय तरी काय? भावाने दिली हेल्थ अपडेट








