Pakistan : वर्ल्ड कपमधला पराभव पचवता आला नाही, पाकिस्तानच्या स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचे आव्हान हे सुपर 8 मध्ये संपुष्ठात आलं होत.त्यामुळे पाकिस्तानी टीम प्रचंड निराश झाली होती.त्यानंतर आता पाकिस्तानच्या एका स्टार खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे.
Sarfaraz Ahmed Announce Retirement : टीम इंडियाने नुकताच कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टी20 वर्ल्डकप जिंकला होता.या घटनेला आता आठवडला उलटला आहे.याच वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचे आव्हान हे सुपर 8 मध्ये संपुष्ठात आलं होत.त्यामुळे पाकिस्तानी टीम प्रचंड निराश झाली होती.त्यानंतर आता पाकिस्तानच्या एका स्टार खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. दरम्यान हा खेळाडू नेमका कोण आहे?हे जाणून घेऊयात.
पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू आणि विकेटकिपर सरफराज अहमदने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे जवळजवळ दोन दशकांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट झाला आहे. सरफराजने त्याच्या कारकिर्दीत पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये पाकिस्तानला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत.
भारताविरूद्ध सामन्यात डेब्यू
सरफराज अहमदचा जन्म हा कराचीत झाला होता. सरफराजने नोव्हेंबर 2007 ला भारताविरूद्ध वनडे सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. सरफराजने त्याच्या करिअरमध्ये 54 टेस्ट,117 वनडे, 61 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने एकूण 6164 धावा केल्या होत्या. त्यात त्याने 6 शतक आणि 35 अर्धशतक केले होते. विकेटकिपर म्हणून ही त्याचा रेकॉर्ड चांगला आहे.त्याने विकेटमागे 315 कॅच आणि 56 स्टंम्पिंग घेतले आहेत.
advertisement
सरफाराजने 50 वनडे, 37 टी20 आणि 13 टेस्ट अशाप्रकारे त्याने 100 सामन्यात पाकिस्तान संघाच नेतृत्व केलं होतं. त्याच्या नेतृत्वात पाकिस्तान टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत नंबर 1 बनली होती. तसेच संघाने सलग 11 टी20 सीरीज जिंकण्याचाही रेकॉर्ड केला होता.
सरफराजच्या कारकिर्दीत त्याने सर्वात मोठा विजय हा इंग्लंड विरूद्ध मिळवला होता. कारण त्याने चॅम्पियन्स ट्ऱॉफी जिंकली होती. फायनलमध्ये पाकिस्तानने भारताचा 180 धावांनी पराभव करून आठ वर्षानंतर आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरलं होतं.या विजयानंतर सरफराज एकमात्र असा कर्णधार बनला ज्याने ज्युनिअर आणि सिनिअर दोन्ही स्तरावर आयसीसी ट्ऱॉफी जिंकली होती.2006 मध्ये श्रीलंकेत खेळवल्या गेलेल्या आयसीसी अंडर 19 सामन्यात भारताला हरवून पाकिस्तान चॅम्पियन बनला होता.
advertisement
दरम्यान सरफराज खानची कामगिरी पाहता त्याला पाकिस्तानचा प्रतिष्ठीत नागरिक सन्मान देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता. तो असा सन्मान मिळवणारा पाकिस्तानचा युवा कर्णधार आहे. दरम्यान मोहम्मद रिझवानने टीममध्ये जागा बनवल्यानंतर सरफराजला खेळण्याची संधी खूपच कमी मिळू लागल्या. सरफराजने पाकिस्तानसाठी शेवटचा सामना हा डिसेंबर 2023 रोजी पर्थमध्ये खेळला होता.
नुकत्याच पार पडलेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानची कामगिरी खूपच खराब होती,त्यामुळे पाकिस्तान सुपर 8 मधून बाहेर झाली होती.त्यानंतर आता संघात बदलावाची शक्यता असताना पाकिस्तानच्या कोचिंग स्टाफमध्ये त्याला मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 15, 2026 5:13 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Pakistan : वर्ल्ड कपमधला पराभव पचवता आला नाही, पाकिस्तानच्या स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा







