सर्वात पहिले तर डिटॉक्स वॉटर हे एक फॅड डायटचा प्रकार आहे. मी अनेक ठिकाणी बघितलं आहे की लोक काही व्हाट्सअप ग्रुप बनवतात त्यावरती वेगवेगळ्या डिटॉक्स ड्रिंकच्या रेसिपी टाकतात की तुम्ही काकडीचे पाणी प्या किंवा तुम्ही तर कुठले पाणी प्या जेणेकरून तुमचं शरीर आहे डिटॉक्स होईल. ABC ज्यूस आहे किंवा काकडीचे ज्यूस आहे असं जर तुम्ही घेतलं तर ते फायदेशीर होतं पण तशी काही एक आवश्यकता नसते. आपल्या शरीरासाठी कारण की आपल्या शरीरामध्ये ऑटोमॅटिकली सर्व गोष्टी या डिटॉक्स होत असतात.
advertisement
Health Tips : दररोज खा तुळशीची पाने, हे आजार जवळ पण नाही येणार, जाणवतील सकारात्मक बदल
बाजारामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वेगवेगळे डिटॉक्स ड्रिंक उपलब्ध आहेत पण ते आपण घेता का म्हणजे कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शुगरचा वापर हा केलेला असतो. त्यासोबतच त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रिझर्व्हेटिव्ह असतात किंवा मिठाचा देखील वापर असतो. ते आपल्यासाठी हानिकारक असतं त्यामुळे डिटॉक्स वॉटर घेतल्यामुळे आपलं शरीर छान राहतं हा एक खूप मोठा गैरसमज आहे, असं आहार तज्ज्ञ प्राची डेकाटे सांगतात.
आपल्या शरीरामध्ये किडनी, लिव्हर किंवा स्कीन हे जे अवयव आहेत हे सर्व ऑटोमॅटिकली शरीरातील सर्व गोष्टी डिटॉक्स करण्याचं काम करतात. तुम्हाला डिटॉक्स वॉटर घेण्याची काही एक आवश्यकता नाही. तुम्ही दिवसभरामध्ये व्यवस्थित पाणी घ्या व्यवस्थित झोप घ्या जेणेकरून तुमचं शरीर ऑटोमॅटिकली हे डिटॉक्स होईल.
रात्री 11 ते 3 या वेळेमध्ये शरीर डिटॉक्स होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे तुम्ही लवकर झोपावं म्हणजे दहा वाजता झोपावं जेणेकरून तुमचं शरीर हे चांगले डिटॉक्स होईल आणि त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डिटॉक्स ड्रिंक घेण्याची आवश्यकता भासणार नाही, असंही आहार तज्ज्ञ प्राची डेकाटे सांगतात.





