Health Tips : दररोज खा तुळशीची पाने, हे आजार जवळ पण नाही येणार, जाणवतील सकारात्मक बदल

Last Updated:

भारतीय संस्कृतीत तुळसला पवित्र स्थान देण्यात आलं आहे. प्रत्येक घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत लावलेली तुळस केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे, तर आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत उपयुक्त आहे.

+
रिकाम्या

रिकाम्या पोटी तुळशीचे पाने खाण्याचे लाभ

बीड : भारतीय संस्कृतीत तुळशीला पवित्र स्थान देण्यात आलं आहे. प्रत्येक घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत लावलेली तुळस केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे, तर आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत उपयुक्त आहे. आयुर्वेदात तुळशीला औषधींची राणी म्हटलं गेलं असून ती जवळपास शंभरहून अधिक आजारांवर उपयोगी ठरते. तज्ज्ञांच्या मते दररोज सकाळी दोन ते तीन ताज्या तुळशीची पानं खाल्ल्याने शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात.
सर्वप्रथम तुळस शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करते. तुळशीच्या पानांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन C आणि झिंक शरीराला सर्दी, खोकला, फ्लू आणि व्हायरल इन्फेक्शनपासून संरक्षण देतात. विशेषत: हिवाळ्यात तुळशीचे सेवन केल्याने नाक बंद होणे, घसा दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास अशा समस्या कमी होतात. तुळस शरीरातील नैसर्गिक संरक्षण प्रणाली मजबूत करते, त्यामुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी ती लाभदायक आहे.
advertisement
तुळशीचा दुसरा मोठा फायदा म्हणजे पचन सुधारते आणि यकृताचे आरोग्य राखले जाते. तुळस पोटातील आम्लता कमी करते आणि पचनरसांना सक्रिय करते. त्यामुळे अपचन, गॅस किंवा ॲसिडिटीच्या तक्रारींमध्ये आराम मिळतो. त्याचबरोबर तुळशीतील जैविक घटक यकृत स्वच्छ ठेवतात आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात. परिणामी त्वचा अधिक स्वच्छ, तजेलदार आणि निरोगी राहते.
advertisement
आरोग्यतज्ज्ञ सांगतात की, तुळस मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम घडवते. तुळशीच्या पानांमध्ये ॲडॅप्टोजेन नावाचे घटक असतात, जे ताणतणाव नियंत्रित करतात आणि मेंदूला शांत ठेवतात. त्यामुळे दररोज तुळस खाल्ल्याने मानसिक शांतता वाढते, झोप सुधारते आणि मनातील तणाव कमी होतो. तसेच तुळस रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाचे आरोग्यही सुधारते.
मात्र तज्ज्ञांचा सल्ला आहे की, तुळस मर्यादित प्रमाणातच सेवन करावी. अती प्रमाणात घेतल्यास ती दातांच्या एनॅमलला नुकसान पोहोचवू शकते. गर्भवती महिला आणि विशिष्ट औषधे घेत असलेल्यांनी तुळशीचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. थोडक्यात तुळस ही फक्त धार्मिक महत्त्व असलेली वनस्पती नाही तर ती रोजच्या जीवनात नैसर्गिक औषधासारखी कार्य करते. नियमित तुळस सेवन केल्याने शरीर, मन आणि आत्मा तिन्ही निरोगी राहतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : दररोज खा तुळशीची पाने, हे आजार जवळ पण नाही येणार, जाणवतील सकारात्मक बदल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement