हेअर डायमुळे डोळ्यांना त्रास होतो का?
ज्या व्यक्तींना अॅलर्जी होते त्यांनी हेअर डाय न वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात. अॅलर्जी असलेल्या व्यक्तीने हेअर डाय वापरल्यास डोळ्यांना त्रास होऊ शकतो. तसेच अकाली केस पांढरे होण्यामुळे अनेक जण त्रस्त असतात. तर त्यांनी खाण्यापिण्याच्या सवयी बदलणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी लवकरात लवकर डॉक्टरची मदत घेऊन उपचार करणे आणि सकस, शुद्ध आणि हेल्दी आहार घेणे महत्त्वाचे असल्याचेही डॉक्टर सांगतात.
advertisement
शक्तीवर्धक गोळ्यांमुळे गेला जीव; या औषधांमुळे असते मृत्यूची भीती?
केमिकल्स वापरणे टाळा
आजकाल केस पांढरे होण्यासाठी वय होण्याची वाट पाहावी लागत नाही. अगदी शालेय वय किंवा तरुणपणातही केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्याची वेगवेगळी कारण असू शकतात. मात्र तुम्ही पांढरे केस काळे करण्यासाठी चुकीच्या पद्धती वापरत असाल तर ते नुकसानदायक ठरू शकतं. अशावेळी नैसर्गिकरित्या कोणत्या वस्तू वापरून केस काळे होऊ शकतात? तर डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार तुम्ही नॅचरल हरबल मेहंदी वापरू शकता. कुठलेही केमिकल्स नसलेली मेहंदी तुम्ही केसांना लावल्यास नुकसान होणार नाही, असे डॉ. चव्हाण सांगतात.
Video: दातदुखीच्या वेदनांपासून घरच्या घरी मुक्ती हवीय? या टिप्स करा फॉलो
डाय नको मेहंदी निवडा
खरंतर अनेक चुकीच्या सवयींमुळे टाळूच्या त्वचेवर वाईट परिणाम होतात. डाय हा कमी वेळात केस काळे करण्यासाठी सोपी पद्धत मानली जाते. मात्र, त्यामुळे केसांचे आरोग्य बिघडू शकते. असं असताना तुम्हाला जर अॅलर्जी असेल तर तुम्ही डाय वापरूच नका. त्या व्यतिरिक्त आपण नैसर्गिक मेहेंदी वापरावी असं डॉक्टर सांगतात. एखाद्या पॅकेटवर नॅचरल किंवा हर्बल असे लिहिले आहे त्यावर न जाता ती मेहंदी खरंच नॅचरल किंवा हर्बल आहे का अशी खात्री करून घेतल्यानंतरच ती मेहंदी केसांना लावावी, असेही डॉक्टर सुचवतात.





