Video: दातदुखीच्या वेदनांपासून घरच्या घरी मुक्ती हवीय? या टिप्स करा फॉलो

Last Updated:

दातांना निरोगी ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा. कीड लागण्यापासूनही सुरक्षा होईल.

+
Video:

Video: दातदुखीच्या वेदनांपासून घरच्या घरी मुक्ती हवीय? या टिप्स करा फॉलो

वर्धा, 20 ऑगस्ट: दातांचे दुखणे कोणालाही सहन होत नाही. दात दुखण्याची तसंच दात किडण्याची समस्या मोठ्यांसह लहान मुलांमध्येही दिसून येते. विशेषतः आजकाल 18 वर्षांच्या आत असलेल्या मुलांमध्येसुद्धा दातांच्या समस्या दिसून येतात. त्यावर सिमेंट भरणे किंवा रूट कॅनल सारख्या ट्रीटमेंट सुद्धा डॉक्टरांना कराव्या लागतात. लहान मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये दात किडण्याची किंवा खराब होण्याची कारणे कोणती आहेत आणि दातांचे आयुष्य वाढवायचे असेल तर कोणत्या गोष्टी फॉलो करणे आवश्यक आहे. याबाबत वर्धा येथील दंतचिकित्सक डॉ. भावना कामडी रिनके यांनी माहिती दिली आहे.
हेल्दी खा दातांचा त्रास टाळा
दात दुखणे ही समस्या उद्भवल्यास होत असलेला त्रास भयंकर स्वरुपाचा असतो. त्यामुळे हा त्रास टाळायचा असेल तर हेल्दी फूड खाणे महत्वाचे आहे. डॉक्टरांनी संगीलेली फळं चावून खाल्यास दात स्वच्छ आणि हिरड्याही मजबूत राहतील. दातांच्या दुखण्यावर लवकर अराम हवा असेल तर त्रास कमी असतानाच डॉक्टरांना दाखवणे महत्वाचं आहे. दातांना नेहमी करिता मजबूत आणि स्वच्छ ठेवायचं असेल तर डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी पाळणे देखील आवश्यक आहे.
advertisement
कोणतं फळं खाण्याचा सल्ला?
दातांमध्ये किड लागणे किंवा दात खराब होणे ही समस्या गंभीर होऊ शकते. हा त्रास टाळायचा असेल तर गाजर, मुळा, सफरचंद, बिट अशाप्रकारचे फळ चावून चावून खाणे गरजेचे आहे. त्यामुळे दात स्वच्छ आणि निरोगी तसेच मजबूत राहण्यास मदत होते, असे डेंटिस्ट सांगतात. कोणत्याही वयातील व्यक्तींनी आपले दात स्वच्छ ठेवायचे असल्यास हेल्दी फळ खाणं महत्त्वाचं आहे. तसेच अन्न खाताना चावून खावं तसेच फास्ट फूड किंवा अनहेल्दी फूड खाऊ नये ते टाळावे, असा सल्ला देखील डॉक्टर देतात.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
Video: दातदुखीच्या वेदनांपासून घरच्या घरी मुक्ती हवीय? या टिप्स करा फॉलो
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement