मनुका आवडीनं खात असाल तर त्याचे फायदे आणि दुष्परिणाम जाणून घेणं गरजेचं आहे. आयुर्वेदात मनुका भिजवून त्याचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. पण मनुका खाणं काही लोकांसाठी हानिकारक देखील असू शकते. कोणताही अन्न घटक जास्त खाणं वाईट तसंच आरोग्यदायी फायदे असूनही मनुकांचे काही तोटेही आहेत.
1. लोह-
मनुका हा लोहाचा चांगला स्रोत मानला जातो. ज्यांना ॲनिमियाचा त्रास आहे त्यांनी मनुका खाव्यात. मनुका खाल्ल्यानं ॲनिमिया दूर होऊ शकतो.
advertisement
Fruits for hair - केसांच्या वाढीसाठी वापरा फळांचा रस, केस बनतील मुलायम आणि चमकदार
2. पचन-
बेदाण्यामध्ये फायबरचे गुणधर्म आढळतात. जे तुमच्या पचनासाठी चांगले मानले जातात. मनुकांमध्ये आढळणारे फायबर पोटासाठी परिणामकारक आहेत. बद्धकोष्ठतेसारख्या पोटाच्या समस्या दूर करण्यास मनुकांची मदत होते.
3. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त-
वजन कमी करण्यासाठी मनुका चांगल्या मानल्या जातात. मनुकांमध्ये असलेले ग्लुकोज फ्रुक्टोज देखील तुमच्या शरीराला प्रचंड ऊर्जा देण्यास उपयुक्त ठरु शकतात.
Coconut, Camphor : नारळ आणि कापूर - त्वचा, केसांसाठी उपयुक्त, सांधेदुखी-सूज होते कमी
मनुका जास्त खाल्ल्यानं होणारे त्रास -
1. अतिसार-
जास्त प्रमाणात मनुका खाल्ल्यानं डायरिया आणि गॅस यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मनुका मर्यादित प्रमाणातच खा.
२. मधुमेह-
टाइप-2 मधुमेहाच्या रुग्णांनी मनुका अजिबात खाऊ नये, ते त्यांच्यासाठी हानिकारक ठरु शकतं.
3. ऍलर्जी-
काहींना मनुकांची ऍलर्जी असते, त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा लोकांनी मनुका खाऊ नयेत.