TRENDING:

Cucumber Juice : उन्हाळ्याचा कडाका वाढतोय, तब्येतीला जपा, काकडीचा ज्यूस प्या

Last Updated:

उन्हाचा कडाका वाढलाय. त्यामुळे आतापासूनच तब्येतीकडे लक्ष द्या. उन्हाळ्यात काकडी, कलिंगड खाणं तब्येतीसाठी चांगलं. उन्हाळ्यात तुम्ही दिवसाची सुरुवातच काकडीच्या ज्यूसनं करु शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीपासूनच उन्हाचा कडाका वाढलाय. त्यामुळे आतापासूनच तब्येतीकडे लक्ष द्या. उन्हाळ्यात काकडी, कलिंगड खाणं तब्येतीसाठी चांगलं. उन्हाळ्यात तुम्ही दिवसाची सुरुवातच काकडीच्या ज्यूसनं करु शकता.
News18
News18
advertisement

रोज सकाळी उठल्यावर काकडीचा ज्यूस प्या. काकडीच्या ज्यूसमध्ये भरपूर फायबर असतं, यामुळे पचनाला मदत होते आणि काकडीमुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. काकडीच्या रसात 80 ते 90 टक्के पाणी असतं, यामुळे शरीराला पुरेशी आर्द्रता मिळते. काकडीच्या रसात नैसर्गिकरित्या पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात, ज्यामुळे हायड्रेशन राखण्यास मदत होते.

त्यात आवश्यक अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व ए, सी आणि के देखील असतात. काकडीच्या ज्यूसमुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि डोळ्यांसाठी देखील काकडी फायदेशीर असते.

advertisement

Women's Day : कुटुंबाकडे लक्ष देताना स्वत:लाही वेळ द्या, जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

याशिवाय काकडीच्या रसामुळे नैसर्गिकरित्या रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. या रसामुळे पोट जास्त काळ भरलेलं राहतं. भूक कमी लागल्यानं वजन कमी करण्यासाठी मदत होते.

काकडीचा रस दररोज पिण्याचे फायदे -

1 - हायड्रेशन

काकडीचा रस हे सर्वात हायड्रेटिंग पेयांपैकी एक आहे. हा रस पचनास देखील मदत करतो आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो.

advertisement

2 - पचन

काकडीचा रस प्यायल्यानं पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते. काकडीत पाण्याचं प्रमाण जास्त असल्यानं आवश्यक पोषक द्रव्य अधिक प्रभावीपणे शोषण्यात मदत होते.

Mosquito Repellent : डासांना वैतागलात ? हे उपाय नक्की करा, घरीच बनवा मॉस्किटो रिपेलेंट

3 - त्वचेसाठी उपयुक्त

त्वचेची जळजळ कमी करण्याची क्षमता काकडीच्या रसात असते. हे सनबर्न, जळजळ आणि इतर त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यास देखील मदत करते.

advertisement

4 - कर्करोग प्रतिबंधासाठी उपयुक्त

काकडीच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. काकडीत असलेले क्युकरबिटासिन संयुग देखील कर्करोगाचा धोका कमी करण्यास हातभार लावतात.

5 - वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

वजन कमी करण्यासाठी काकडीचा रस खूपच उपयुक्त आहे. Weight Management म्हणजेच वजन व्यवस्थापनासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Cucumber Juice : उन्हाळ्याचा कडाका वाढतोय, तब्येतीला जपा, काकडीचा ज्यूस प्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल