Mosquito Repellent : डासांना वैतागलात ? हे उपाय नक्की करा, घरीच बनवा मॉस्किटो रिपेलेंट
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
डास चावल्यानं मलेरिया आणि डेंग्यूसारख्या धोकादायक आजारांचा धोकाही वाढतो. डासांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तुम्हीही विविध पद्धतींचा अवलंब करत असाल. काही साहित्य वापरुन तुम्ही घरीच मॉस्किटो रिपेलेंट तयार करु शकता.
मुंबई : तुमच्या घरीही डासांची दहशत असेल तर वेळीच सावध व्हा. उन्हाळ्याच्या हंगामात डास दिवस - रात्र वैताग आणतात. डास चावल्यानं मलेरिया आणि डेंग्यूसारख्या धोकादायक आजारांचा धोकाही वाढतो.
डासांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तुम्हीही विविध पद्धतींचा अवलंब करत असाल. डासांना घालवण्यासाठी काही जण अगरबत्ती लावतात. अगरबत्तीच्या धुरामुळे अनेकांना श्वसनाचा त्रास होतो. काही साहित्य वापरुन तुम्ही घरीच मॉस्किटो रिपेलेंट तयार करु शकता.
मॉस्किटो रिपेलेंट्सही महाग आहेत आणि त्यातून निघणारी रसायनं आरोग्यासाठी हानिकारक आहेत. अशा परिस्थितीत डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही नैसर्गिक मार्गांचा अवलंब केला जाऊ शकतो. अशीच एक युक्ती आहे ज्यामध्ये नारळाच्या तेलाच्या मदतीनं मच्छर प्रतिबंधक म्हणजेच मॉस्किटो रिपेलंट घरी बनवता येतं.
advertisement
डासांसाठी नैसर्गिक प्रतिकारक कसं बनवायचं ?
रिपेलेंटचे रिकामे रिफिल घ्या, ते उघडल्यानंतर त्यात थोडे खोबरेल तेल टाका. तेल घातल्यानंतर कापुराचे तुकडे या रिफिलमध्ये टाका आणि नीट ढवळून घ्या. आता त्याचं झाकण बंद करा. आता हे रिफिल मॉस्किटो रिपेलेंट मशीनमध्ये ठेवा आणि मशीन चालू करा. यामुळे डास येण्याचं प्रमाण कमी होईल.
advertisement
खोबरेल तेल आणि कापुराचा वास डासांना दूर ठेवण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. डासांना घालवण्यासाठी ही पद्धत उत्तम आहे कारण याचा आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही.
कडुनिंब
कडुनिंब आणि खोबरेल तेलाच्या फवारणीनं डास पळतील. कडुनिंबाच्या तेलाचा वास डासांना असह्य करतो.
कडुनिंबाच्या तेलाचा स्प्रे तुम्ही घरीच बनवू शकता. कडुनिंबाचं तेल स्प्रे बाटलीत घ्या. आता त्यात थोडं खोबरेल तेल टाका. थोडा कापूर त्यात घाला. चांगलं मिसळून घ्या. संध्याकाळी फवारणी केली घरातील सर्व डास दूर होतील.
advertisement
लिंबू आणि कापूर
एक लिंबू अर्ध कापून घ्या. या अर्ध्या कापलेल्या लिंबाच्या आतील भागात तीन ते चार लवंगा घाला. हे लिंबू खोलीत ठेवा. त्याच्या वासामुळे डास खोलीतून पळून जातील. याशिवाय कापुराच्या वासानंही डास पळून जातात. खोली बंद करून त्यात कापूरचा तुकडा पेटवून ठेवा. त्याच्या वासानं डास पळून जातील.
advertisement
- सुक्या संत्र्याची सालं जाळून धूर निर्माण केल्यानंही डास पळून जातात.
- काही झाडं डासांना दूर ठेवण्यासाठी चांगली असतात. विशिष्ट प्रकारच्या वनस्पतींच्या वासामुळे डास पळून जातात.
- तुम्ही घरामध्ये सिट्रोनेला रोप लावू शकता, त्याच्या वासानं डास पळून जातील.
- याशिवाय पेपरमिंट आणि लेमन ग्रासची झाडं देखील डासांना दूर ठेवतात. .
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 07, 2025 6:46 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Mosquito Repellent : डासांना वैतागलात ? हे उपाय नक्की करा, घरीच बनवा मॉस्किटो रिपेलेंट