Vitamins Deficiency : आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका, जीवनसत्त्वांची कमतरता ठरेल आजाराचं कारण, महिलांसाठी विशेष सल्ला

Last Updated:

महिलांच्या शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता फार लवकर जाणवते. त्यामुळे आरोग्य उत्तम राखण्यासाठी काही गोष्टी नियमित करणं जास्त गरजेचं आहे.

News18
News18
मुंबई : महिलांच्या शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता फार लवकर जाणवते. त्यामुळे आरोग्य उत्तम राखण्यासाठी काही गोष्टी नियमित करणं जास्त गरजेचं आहे. पुरुषांच्या तुलनेत, काही जीवनसत्त्व आणि खनिजं अशी असतात ज्यांची कमतरता महिलांच्या शरीरात लवकर जाणवते.
महिलांच्या शरीरात कोणत्या जीवनसत्त्वांची कमतरता त्वरीत जाणवते आणि त्यासाठी काय करणं गरजेचं आहे पाहूयात.
1. व्हिटॅमिन डी
हाडं आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी खूप महत्वाचं आहे. महिलांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता खूप मोठ्या प्रमाणात आढळते. विशेषत: ज्या स्त्रिया घरात जास्त राहतात किंवा ज्या स्त्रिया सनस्क्रीन वापरतात अशा स्रियांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवते.
advertisement
2. लोह
लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी लोह खूप महत्वाचं आहे. स्त्रियांमध्ये लोहाची कमतरता दिसून येते. विशेषत: ज्या स्त्रिया गर्भवती आहेत किंवा ज्या स्त्रियांना मासिक पाळी येत आहे अशा महिलांमध्ये हे प्रमाण जास्त असतं. 
advertisement
3. कॅल्शियम
हाडं आणि दात मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम खूप महत्वाचं आहे. महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता खूप सामान्य आहे. ज्या महिला रजोनिवृत्तीच्या जवळ आहेत त्यांच्यामध्ये हे प्रमाण जास्त आढळतं.
4. व्हिटॅमिन बी 12
लाल रक्तपेशी आणि मज्जासंस्था तयार करण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 खूप महत्वाचं आहे. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते.
advertisement
आहाराबद्दल सूचना :
व्हिटॅमिन डी: व्हिटॅमिन डीसाठी तुम्ही मासे, अंडी, दूध आणि मशरूम खाऊ शकता. तुम्ही काही वेळ उन्हातही बसू शकता.
लोह: लोहासाठी तुम्ही पालक, बीन्स, कडधान्ये आणि लाल मांस खाऊ शकता.
कॅल्शियम: कॅल्शियमसाठी तुम्ही दूध, दही, चीज आणि हिरव्या पालेभाज्या खाऊ शकता.
advertisement
व्हिटॅमिन बी 12: व्हिटॅमिन बी 12 साठी, तुम्ही मांस, मासे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकता.
महिलांसाठी आरोग्य टिप्स
महिलांनी वर्षातून एकदा तपासणी करणं आवश्यक आहे.
महिलांनी निरोगी अन्नाचं सेवन करावं आणि नियमित व्यायाम करावा.
महिलांनी पुरेशी झोप घेतली पाहिजे.
महिलांनी तणावापासून दूर राहावं.
महिलांनी आपल्या आरोग्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. तुम्हाला काही आरोग्य समस्या असल्यास, तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Vitamins Deficiency : आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका, जीवनसत्त्वांची कमतरता ठरेल आजाराचं कारण, महिलांसाठी विशेष सल्ला
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement