Homemade Shampoo: या घरगुती उपायानं बनवा नैसर्गिक शॅम्पू, केस दिसतील चमकदार
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
अनेकदा केस चांगले दिसावेत यासाठी महागडी उत्पादनं वापरली जातात. पण हवा तसा परिणाम दिसून येत नाही. काही नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या शॅम्पूमुळे केस मुळांपासून काळे, घट्ट आणि मजबूत राहू शकतात.
मुंबई: केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही बरेच पर्याय वापरले असतील..त्यातच आणखी एक माहिती घरी बनवता येणाऱ्या शॅम्पूची..केस मजबूत आणि दाट हवे असतील तर घरगुती उपाय वापरून शॅम्पू तयार करता येईल. ज्याचा वापर करून काही दिवसातच तुमचे केस सुंदर दिसतील.
अनेकदा केस चांगले दिसावेत यासाठी महागडी उत्पादनं वापरली जातात. पण हवा तसा परिणाम दिसून येत नाही. काही नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या शॅम्पूमुळे केस मुळांपासून काळे, घट्ट आणि मजबूत राहू शकतात.
advertisement
होममेड शॅम्पू बनवण्यासाठी आवश्यक गोष्टी
कोरफड
कडुनिंबाची पानं
शिकेकाई
रिठा
होममेड शॅम्पू बनवण्याची प्रक्रिया -
सर्व प्रथम एक भांड घ्या. या भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. या पाण्यात कडुनिंबाची पानं टाका. कडुनिंबाची 10 ते 15 पानं घ्या. या पाण्यात रिठाही मिसळा. रिठा मिसळण्यापूर्वी त्याच्या बिया काढून वेगळे करा.
advertisement
पाणी नीट उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि पाणी झाकून ठेवा. त्यामुळे रिठा आणि कडुनिंबाच्या पानांचे गुणधर्म पाण्यात व्यवस्थित मिसळतात. हे पाणी कोमट झाल्यावर त्यात 2-3 चमचे कोरफडीचे जेल टाका. शेवटी शिकेकाई पावडर घाला आणि पुन्हा झाकून ठेवा. पाणी पूर्णपणे थंड झाल्यावर बारीक कापडाच्या किंवा पातळ गाळणीच्या साहाय्यानं गाळून घ्या.
advertisement
हा घरगुती शॅम्पू लावण्यापूर्वी केस विंचरुन घ्या, केसांना नीट मसाज करा. जेणेकरून केसांना शॅम्पू लावता येईल.
कमीत कमी पंधरा मिनिटं केसांवर शॅम्पू राहू द्या. आंघोळ करताना केस चांगले धुवावेत. केस किंवा टाळूवर कोणताही शॅम्पू शिल्लक राहणार नाही याकडे लक्ष द्या. हा शॅम्पू तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरू शकता.
होममेड शॅम्पू वापरण्याचे फायदे -
advertisement
या घरगुती शॅम्पूमधील सर्व नैसर्गिक घटक केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. कडुनिंबामध्ये दाहक-विरोधी, बुरशीविरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे टाळूवर कोणत्याही प्रकारचं संक्रमण होऊ शकत नाही.
कोरफडीच्या जेलमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुण देखील असतात. यामुळे, टाळू हायड्रेटेड राहतो. ज्यामुळे केस मजबूत होतात. शिकेकाई आणि रिठ्यामुळे केस मजबूत होतात. त्यांचा नियमित वापर केल्यानं केसांची गळतीही कमी होते. या शॅम्पूमुळे केस हानिकारक रसायनांपासूनही सुरक्षित राहतात. त्यामुळे हा शॅम्पू नक्की वापरुन बघा.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 06, 2025 2:42 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Homemade Shampoo: या घरगुती उपायानं बनवा नैसर्गिक शॅम्पू, केस दिसतील चमकदार