advertisement

Watermelon: किडनीसाठी रामबाण उपाय, कलिंगड खा, उन्हाळ्यात राहा हायड्रेटेड

Last Updated:

उन्हाळा सुरू झाला आहे, त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. किडनीचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी कलिंगड हे फळ रामबाण उपाय आहे. उन्हाळ्यात येणारं कलिंगड हे फळ चव आणि आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. कलिंगडाचा रस सेवन करणं किडनी निरोगी राहण्यासाठी महत्त्वाचं आहे.

News18
News18
मुंबई: यंदा उन्हाळ्याच्या झळा लवकर जाणवायला सुरुवात झाली आहे. उन्हाळा आला की डिहायड्रेशनचं प्रमाण वाढतं. त्यामुळे पुरेसं पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. सध्याच्या काळात किडनीशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. याचं एक कारण म्हणजे अनारोग्य आहार आणि जीवनशैली.
आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी सर्व अवयव महत्त्वाचे आहेतच. त्यातलाच किडनी हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचं महत्त्वाचं काम किडनी करते. किडनीचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी कलिंगड हे फळ रामबाण उपाय आहे. 
advertisement
उन्हाळ्यात येणारं कलिंगड हे फळ चव आणि आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. कलिंगडाचा रस पिणं किडनी निरोगी राखण्यासाठी महत्त्वाचं आहे. रक्तातील खनिजं, क्षार, पाण्याचं संतुलन राखणं कलिंगडातील घटकांमुळे शक्य होतं. शरीर आणि किडनी निरोगी ठेवण्यासाठी आहारात योग्य बदल करणं गरजेचं आहे.
किडनीच्या आरोग्यासाठी उपयुक्त कलिंगडाचा रस:
advertisement
कलिंगड हे उन्हाळ्यातील फळ. त्यात नव्वद टक्के पाणी असतं. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, बी6, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, फोलेट आणि कॅल्शियमसारखे गुणधर्म आढळतात. जे शरीराला अनेक समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात. तुम्ही त्याचा आहारात अनेक प्रकारे समावेश करू शकता.
advertisement
1. मूत्रपिंड-
किडनीच्या रुग्णांसाठी कलिंगडाचा रस खूप फायदेशीर मानला जातो. हा रस प्यायल्यामुळे किडनी दुखणं आणि सूज यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.
2. डिहायड्रेशन-
उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. अशा परिस्थितीत पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी कलिंगड खा किंवा कलिंगडाचा रस प्या.
3. त्वचा-
कलिंगडाचा रस प्यायल्यानं त्वचा दीर्घकाळ तजेलदार दिसते. यामुळे वयाचा प्रभाव कमी होण्यास मदत होऊ शकते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Watermelon: किडनीसाठी रामबाण उपाय, कलिंगड खा, उन्हाळ्यात राहा हायड्रेटेड
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement