advertisement

Mumbai News: मित्राच्या बर्थडे पार्टीत दारू पिणं अंगाशी आलं, कोणालाही न सांगता निघाला अन्...

Last Updated:

कुर्ल्यामध्ये मित्राच्या बर्थडे पार्टीमध्ये दारू पिणं एका तरूणाच्या जीवावर बेतलं आहे. बाईकवरून घरी जात असताना त्याचा मृत्यू झाला आहे.

News18
News18
मुंबई: मित्राच्या बर्थडे पार्टीमध्ये दारू पिणं एका तरूणाच्या अंगलट आलं आहे. मित्राच्या बर्थडे पार्टीमध्ये दारू पिऊन एका तरूणाच्या जीवावर बेतलंय. ही घटना बुधवारी रात्री कुर्ल्यामध्ये घडली आहे. रात्री पार्टी आटोपल्यानंतर घरी जात असताना कुर्ल्यातील रस्त्यावर तरूणाचा बाईकवरील नियंत्रण सुटून डिव्हाईडरवर त्याची बाईक जाऊन आदळली. या अपघातामध्ये त्या तरूणाचा मृत्यू झाला आहे.
कुर्ल्यामध्ये मित्राच्या बर्थडे पार्टीला जाणं एका तरूणाच्या अंगाशी आलं आहे. कुर्ला पूर्वेतील नेहरूनगरमधील गणेश हॉलच्या मागच्या बाजूला मित्राने त्याच्या पार्टीचं आयोजन केलं होतं. हिच पार्टी उरकून बाईकने घरी जात असताना बुधवारी रात्री आकाश आग्रे नावाच्या तरूणाचा अपघाती मृत्यू झाला. आकाश आग्रे हा तरूण चेंबूरच्या नागेवाडी परिसरातील रहिवासी होता. घरी जात असताना त्याची बाईक रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या डिव्हायडरवर जाऊ धडकली, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
advertisement
मित्राच्या बर्थडेचं निमित्त म्हणून आकाशने दारू प्यायली होती. दारूच्या नशेमध्येच आकाशने कोणत्याही मित्राला घरी जात असल्याचं न सांगता बाईकने निघाला. सांताक्रूझ- चेंबूर लिंक रोड पुलावरील कुर्ल्यातील डेअरी रोडवरील असलेल्या चढावरच्या डिव्हायडरवर तरूणाची बाईक आदळली. बाईकवरील नियंत्रण सुटल्यामुळे बाईक थेट दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातामध्ये त्या तरूणाच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली होती. तिथल्या स्थानिकांनी त्याला तात्काळ राजावाडी रूग्णालयात दाखल केले. पण त्याला लगेचच डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: मित्राच्या बर्थडे पार्टीत दारू पिणं अंगाशी आलं, कोणालाही न सांगता निघाला अन्...
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement