Amla Tea : आरोग्यदायी आवळा, आवळा चहा प्या, निरोगी रहा

Last Updated:

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह यासारखे पोषक घटक आढळतात. हे सर्व घटक तब्येतीसाठी आवश्यक आहेत, त्यामुळे आवळा नक्की खा,  आवळ्याचा चहा प्या, आवळा नुसता खा किंवा ज्यूस, लोणचं अशा कोणत्याही पद्धतीनं आवळ्याचा आहारात समावेश करा.

News18
News18
मुंबई : दिवसाची सुरुवात चहा - कॉफीनं करत असाल तर आणखी एका पर्यायाची माहिती तुमच्यासाठी..
तुम्ही दुधाऐवजी आवळा चहा पिणं सुरू करू शकता. तुमच्या आरोग्यासाठी आवळा कसा उपयुक्त ठरु शकतो पाहूया.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह यासारखे पोषक घटक आढळतात. हे सर्व घटक तब्येतीसाठी आवश्यक आहेत, त्यामुळे आवळा नक्की खा,  आवळ्याचा चहा प्या, आवळा नुसता खा किंवा ज्यूस, लोणचं अशा कोणत्याही पद्धतीनं आवळ्याचा आहारात समावेश करा.
advertisement
सकाळची सुरुवात तुम्ही दुधाच्या चहानं करता पण आज आवळा चहा पिण्याचे फायदे बघूया. ज्यामुळे तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात निरोगी करू शकता. पाणी उकळत ठेवा, त्यात चिरलेला आवळा घाला, आणि गाळून प्या.
आवळा चहा पिण्याचे फायदे -
advertisement
आवळ्यामधील सर्व पोषक घटक शरीरासाठी आवश्यक आहेत. डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवळा खूप चांगला आहे. यामुळे तुमची दृष्टी मजबूत होते. त्वचेच्या आरोग्यासाठीही आवळा उत्तम. यामुळे चेहऱ्यावर चमक येते आवळ्यामुळे केसांना चमक येते आणि अंतर्गत ताकद मिळते. आवळ्यातील व्हिटॅमिन सीमुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत होते. यामुळे हाडं आणि दात मजबूत होतात. याशिवाय आवळा वजन संतुलित ठेवण्यासही उपयुक्त आहे. आवळ्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असतात, यामुळे तुम्हाला ऊर्जावान वाटतं. त्याच वेळी, आवळ्यामध्ये अधिक फायबर असतं, पोटाच्या आरोग्यासाठी फायबर चांगलं मानलं जातं.
advertisement
आवळ्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी याची मदत होते, त्याचबरोबर आवळ्यातील अँटीऑक्सिडंट्स कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात. आवळ्यातील दाहक-विरोधी गुणधर्म हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत करतात. 100 ग्रॅम ताज्या आवळ्यामध्ये 20 संत्र्यांइतके व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे आहारात आवळ्याचा समावेश नक्की करा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Amla Tea : आरोग्यदायी आवळा, आवळा चहा प्या, निरोगी रहा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement